31 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीयशिवसेना ठाकरे गट लढवणार एवढ्या जागा; संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

शिवसेना ठाकरे गट लढवणार एवढ्या जागा; संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

राज्यात आगामी लोकसभी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सध्या राज्यामध्ये आगामी निवडणुका लक्षात घेत सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. काही दिवसांआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यामध्ये २५ जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. अशातच आता शिवसेना ठकरे गट किती जागा लढवणार याकडे तमाम राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र आता त्याबाबत माहिती आता समोर आली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. ते लोकसभेच्या २३ जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी जाऊन भेट घेतली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही २३ जागा लढवणार आहोत. कॉंग्रेस २५ जागा लढवणार आहेत. यावर राऊत म्हणाले कॉंग्रेसने ४८ जागा लढवाव्यात. गुरूवारी आम्ही कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा केली आहे.

महाराष्ट्रातील जागा वाटपासाठी आम्ही दिल्लीतील कॉंग्रेससोबत चर्चा केली आहे. दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांबरोबर चांगले मधूर संबंध असल्याचं राऊत म्हणाले आहेत. याचवेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. ते महाविकास आघाडीचा भाग असावेत अशी चर्चा झाली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा

थर्टी फर्स्ट आणि नाताळ होणार दणक्यात साजरा; पहाटे पाच वाजेपर्यंत बार असणार सुरु

साक्षी मलिकची कुस्ती क्षेत्रातून राजीनाम्याची घोषणा

भारत-पाकिस्तान टी 20 वर्ल्डकपचा सामना होणार ‘या’ दिवशी; तारीख आली समोर

विजय वडेट्टीवार जागापाटपावरून कडाडले

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर संजय राऊत यांचा दावा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की कोण कीती जागा लढवणार? हा वादाचा मुद्दा होणार नाही. ज्यांची शक्ती अधिक आहे. मेरीटवर जागा लढवता येतात. हा राज्यस्तरावरचा निर्णय नाही. केंद्रीय स्तरावरचा निर्णय असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत. प्राथमिक चर्चाही झाली नाही मग जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठं? असा सवाल आता वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी