30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून विखे-पाटलांचा संभाजीराजेंना सल्ला

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून विखे-पाटलांचा संभाजीराजेंना सल्ला

टीम लय भारी

मुंबई :- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज नाराज झाल आहे. मराठा समाज आणि संभाजी राजे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा समाजासाठी राज्य सरकारने 5 महत्वाच्या गोष्टी कराव्यात अशी मागणी करत त्या 5 गोष्टी संभाजीराजे यांनी सांगितल्या आहेत. त्यावर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संभाजीराजे यांना एक सल्ला दिला आहे(BJP leader Radhakrishna Vikhe-Patil has given a piece of advice to Sambhaji Raje).

संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्य सरकारला 3 कायदेशीर पर्याय दिले आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची आहे. परंतु, राज्य सरकारला फक्त अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडण्याची गरज असल्याचे विखे पाटील (Vikhe-Patil) म्हणालेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून अरविंद सावंतांची संभाजीराजेंवर बोचरी टीका

आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटलांचा संभाजीराजेंना खोचक टोला

Mamata Banerjee accuses Modi of pursuing vendetta politics, says he cannot accept Bengal poll defeat

महाविकास आघाडी अपयशी ठरल्याने केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ खर्ची जात आहे. सरकारमधील मंत्री जी विधाने करत आहेत. त्यावरुन सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही. सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र यावे. एकत्रितपणे सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले आहे. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी नवा पक्ष काढावा किंवा नाही हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी केली नाही. सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी, असेही विखे-पाटील (Vikhe-Patil) यांनी म्हटले आहेत.

‘महाविकास आघाडी सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरु’

या सरकारचा लौकिक फक्त घोषणाबाज सरकार म्हणून आहे. कोविडच्या काळात काम करताना अनेक पत्रकारांना प्राण गमवावे लागले. मंत्र्यांनी अनेकदा मदतीची घोषणा केली. परंतु अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. याउलट केंद्राने पाठपुरावा करुन 5 लाखांची मदत दिली. म्युकरमायकोसिस रुग्णांचा उपचाराचा खर्च पाहता राज्य सरकारने योजनेतून दिलेली मदत अत्यल्प आहे. यात इजेक्शनचा खर्चही भागणार नाही. महाविकास आघाडी सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरु आहे, अशा शब्दात विखे-पाटलांनी (Vikhe-Patil) राज्य सरकारवर टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी