29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्ररक्तातील नात्यांच्या गळाभेटीमुळे कैद्यांच्याही अश्रूंचा फुटला बांध..!

रक्तातील नात्यांच्या गळाभेटीमुळे कैद्यांच्याही अश्रूंचा फुटला बांध..!

कारागृहात जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या पुरुष व महिला कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून स्वतःच्या कुटुंबाप्रती त्यांच्या मनात सहानुभूती आणि आपुलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वच मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी "लय भारी"शी बोलताना दिली.

राज्यातील कारागृहांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना रक्ताच्या नातेसंबंधातील ओलावा जपता यावा, म्हणून तुरुंग प्रशासनाने कारागृहात बंदीवानांच्या जीवलगांची गळाभेट घालून देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. कारागृहात आप्तस्वकीयांची गळाभेट घडू लागल्याने कैद्यांच्या जीवनातील नैराश्य दूर पळू लागले आहे. आपली मुले, नात, नातू , भाऊ, बहीण यांना साक्षात डोळ्यापुढे बघून कैद्यांच्या भावना अनावर होऊन त्यांच्या अश्रूंचा बांध फुटू लागला आहे. हा उपक्रम सुरू केल्याबद्दल कैद्यांच्या नातेवाईकांकडून तुरुंग प्रशासनाचे आभार मानले जात आहे.

कारागृहात जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या पुरुष व महिला कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून स्वतःच्या कुटुंबाप्रती त्यांच्या मनात सहानुभूती आणि आपुलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वच मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी “लय भारी”शी बोलताना दिली.

ते म्हणाले, हातून गंभीर गुन्हा घडल्याने या कैद्यांना अपराधी म्हणून शिक्षा भोगावी लागते. मात्र, त्यांच्यातही कुठेतरी चांगला माणूस दडलेला असतो. कुटुंबापासून दुरावलेल्या या बंदीवानांच्या जखमेवर मायेची फुंकर घालण्याच्या हेतूने त्यांच्याशी रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तींची गळाभेट घालून देण्याचा हा उपक्रम सर्वच कारागृहांमध्ये राबविला जात आहे. या भावनिक उपक्रमात कुटुंबातील १६ वर्षांखालील मुलामुलींना कैद्यांची प्रत्यक्ष गळाभेट घेण्याची संधी दिली जात आहे.

हे सुध्दा वाचा :

राजीव गांधींसारखे मोदींना बॉम्बने उडवून देऊ; पंतप्रधानांना धमकीचे पत्र

शहीद अतिकच्या हत्येचा सूड घेऊ; ‘अल कायदा’चा आतंकी इशारा

19 वर्षे वास्तव्य असलेल्या बंगल्यातून राहुल गांधींची एक्झिट; म्हणाले, “सत्य बोलण्याची किंमत..”

या गळाभेटीतून कैद्यांना मानसिक व कौटुंबिक आधार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांच्या मनातील नैराश्य दूर केले जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटल्या गेलेल्या या कैद्यांना कौटुंबिक जबाबदारीची पुन्हा जाणीव करून देऊन त्यांच्या रक्ताच्या नात्याची वीण आणखी घट करण्याचा तुरुंग प्रशासनाचा उद्देश आहे. सर्व कारागृहांच्या अधीक्षकांना गळाभेटीचा हा उपक्रम प्राधान्याने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी