31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमुंबईEknath Shinde : जयंत पाटलांचे मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदेना पत्र

Eknath Shinde : जयंत पाटलांचे मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदेना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवले आहे. गणेशोत्सवाच्या काळात अत‍िरिक्त लोकल सेवा वाढविण्याबाबत हे पत्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवले आहे. गणेशोत्सवाच्या काळात अत‍िरिक्त लोकल सेवा वाढविण्याबाबत हे पत्र आहे. जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे मागील बुधावारी आगमन झाले. मुंबईसह संपूर्ण राज्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने दोन वर्षांनंतर आपण हा उत्सव निर्बंधाशिवाय साजरा करत आहोत. मुंबईत गणेशोत्सवाची शान काही औरच असते याची कल्पना आपल्याला असेलच. श्री सिद्धी विनायक मंद‍िर, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, जी.एस.बी. मंडळ, गिरगावचा राजा अशा अनेक प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाव‍िक मोठी गर्दी करतात.

नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रात्र आणि दिवसही न पाहता 8 तास रांगेत उभे राहतात. रात्री उशीरा दर्शन घेऊन परतल्यानंतर त्यांना पहाटेच्या पहिल्या ट्रेनची वाट पहावी लागते. अशा परिस्थितीमध्ये आपण केंद्र सरकारशी चर्चा करुन रात्री शेवटच्या लोकल नंतरही भाविकांसाठी काही विशेष लोकल सेवा सुरु करण्याबाब विनंती करावी. त्यामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळेल. आपले सण, उत्सव जपण्याचे अधिकार राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहेत. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

हे सुद्धा वाचा

Navneet Rana : नवनीत राणांना ‘तोंड सांभाळण्याचा’‍ शिवसेनेचा इशारा

Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांना मिळणार सडलेले मासे !

Cyrus Mistry : भयंकर ! दररोज 41 जण सीट बेल्ट न लावल्यामुळे आपला जीव गमावतात

अशा प्रकारचे पत्र जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (knath Shinde ) यांना पाठवले आहे. आता विरोधी पक्षातील नेत्यांच्या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती दखल घेतात हा देखील औत्सुक्याचा विषय आहे. महाविकास आघाडीच्या काळात दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. तसेच हे सरकार हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार आहे. त्यामुळे जयंत पाटलांचा हा सल्ला मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या पचनी पडतो का ? हा देखील उत्सुकतेचा विषय आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी