31 C
Mumbai
Tuesday, February 13, 2024
Homeराजकीयशरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर

शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर

राज्यात भावी मुख्यमंत्री आशयाच्या बॅनरबाजीवरुन अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. भावी मुख्यमंत्री पदासाठी शर्यत होत आहे. यासाठी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना संधी दिली जाणार अशी चर्चा होती. तर कल्याणमध्ये कॉंग्रेस नेते नाना पटोले गेले असता भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. अजित पवार देखील भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, सुप्रिया सुळेंचं नाव भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत होतं. मात्र आता राज्याचे अन्न-नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे बॅनर लावण्यात आले. हे बॅनर इंदापूर येथे लावण्यात आले आहेत. ओबीसी एल्गार मेळाव्याची सभा घेत असताना भुजबळांच्या भावी मुख्यमंत्री पदाची बॅनरबाजी करण्यात आली. यामुळे आता राजकारणात रंगत निर्माण होऊ लागली आहे.

(९ डिसेंबर) दिवशी राज्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार सभा आयोजित केली. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच सभा आहे. ओबीसी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला समावून न घेण्याच्या उद्देशाने ही सभा भरवण्यात आली आहे. या सभेला छगन भुजबळ संबोधित करत आहेत. मात्र याच सभेत भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ अशी बॅनरबाजी करण्यात आली. यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. विशेष म्हणजे शरद पवारांचा बारामतीप्रमाणे इंदापूर बालेकिल्ला आहे. याच ठिकाणी भुजबळांचे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावण्यात येणं म्हणजे ‘दाल में कुछ काला’, अशी परिस्थिती उपस्थित होण्याची चर्चा आहे.

हे ही वाचा

महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव कधी आणि कुठे?

‘इतकं स्नेहसंबंध आहे तर पत्र का लिहावं लागलं?; ‘नावब’चा जवाब द्या’

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील नगरसेवक’

काय आहे बॅनरमध्ये?

छगन भुजबळांच्या इंदापूरातील भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ अशा आशयाचे लिखाण करण्यात आलं. बॅनरमध्ये छगन भुजबळ आहेत आणि त्या फोटोखाली ओबीसींचा मुख्यमंत्री असा आशय लिहिण्यात आला असून राज्याच्या राजकारणात मोठे ट्विस्ट घडत आहे. दरम्यान, इंदापूरात ओबीसी एल्गार सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी झाली.

या सभेमध्ये १ टन पोहे, ५० हजार पाणी बॉटल, ५०० लिटर दूधाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात चहा, पोहे आणि दूध म्हणून नाष्ट्याची सोय आहे. दुपारच्या सत्रात जेवणाची सोय आहे. या सभेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, महादेव जाणकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी