29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयसुटीला दुबईला न जाता वेरूळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला :...

सुटीला दुबईला न जाता वेरूळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला : सुप्रिया सुळे

टीम लय भारी

मुंबई: सोलापूर ग्रामीणच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाला खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी भेट दिली. सुप्रिया सुळे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या उपक्रमाचे कौतुक केले  आहे.

सोलापूरजवळच्या मुळेगाव तांडा येथे सुरु झालेला हा उपक्रम संपूर्ण देशासाठी पथदर्शी असं सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी म्हटलं आहे. सुट्टीला दुबईला न जाता वेरुळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. ‘मेड इन इंडिया’ वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आहे.

सुटीला दुबईला न जाता वेरूळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमाबाबत बातम्यांमधून वाचले होत्या. आज त्यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर हे काम किती महत्वाचे आहे हे आणखी जवळून पाहता आले असे म्हटले आहे. मुळेगाव तांडा येथील ‘ऑपरेशन परिवर्तन’ या नावाने सुरु केलेल्या अभियानांतर्गत त्यांनी एकेकाळी देशी दारु गाळणाऱ्या महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध करुन दिला गेला आहे.

त्यांचे समुपदेशन करुन पोलीस अधिक्षक सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन राबविला. पोलीस अधिक्षक सातपुते सुंदर विणकाम, नक्षीकाम करणाऱ्या महिलांचे सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे.

सुटीला दुबईला न जाता वेरूळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला : सुप्रिया सुळे

 

हे सुद्धा वाचा : 

लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक : सुप्रिया सुळे

Protests Outside Sharad Pawar’s House, Daughter Supriya Sule Surrounded

मराठी तरूणांना उद्योजक बनविणारी चळवळ| The Maharashtra Udyog

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी