32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटेक्नॉलॉजीसावधान; मोबाईल खिशात असताना फेसबुक ऐकते तुमचे बोलणे!

सावधान; मोबाईल खिशात असताना फेसबुक ऐकते तुमचे बोलणे!

हे सत्य आहे. पत्रकार नितीन त्रिपाठी यांनी स्वत: हा प्रयोग करून बघितला. फेसबुक अधिकृतरित्या जरी यूझर्सचे बोलणे रेकॉर्ड करत नाही, असा दावा करीत असले तरी ते तुमचे बोलणे नक्कीच ऐकते यात शंका नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या प्रयोगाचे निरीक्षण सोशली शेअर केले आहे.

सावधान; मोबाईल खिशात असताना फेसबुक ऐकते तुमचे बोलणे! विश्वास नाही ना बसत? पण हे सत्य आहे. (BeAware Facebook Records Your Talk) पत्रकार नितीन त्रिपाठी यांनी स्वत: हा प्रयोग करून बघितला. फेसबुक अधिकृतरित्या जरी यूझर्सचे बोलणे रेकॉर्ड करत नाही, असा दावा करीत असले तरी ते तुमचे बोलणे नक्कीच ऐकते यात शंका नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या प्रयोगाचे निरीक्षण सोशली शेअर केले आहे.

या होळीत त्रिपाठी यांनी एक प्रयोग केला. त्यांनी स्वत:चा आणि पत्नीचा फोन खिशात ठेवला. त्यांचा स्वत:चा आयफोन तर पत्नीचा अँड्रॉइड मोबाईल आहे. रस्त्यावरून निवांत चालता-चालता या दाम्पत्याने होळीच्या मेन्यूबद्दल चर्चा केली. रंगलेली ही चर्चा शेवटी पोहोचली ‘दाल पकवान’वर. होळीच्या मेजवानीचा बाकी सर्व मेनू फायनल झाला; पण वेगवेगळ्या कारणांनी दाल पकवान काही फायनल होऊ शकले नाही.

या जोडप्याने मग पाच मिनिटांचा ब्रेक घेतला आणि फेसबुक (मेटा) चेक केले. बायकोच्या फेसबुक अकाऊंटवर होळीचे व्हिडीओ, बातमी, लेख, दाल पकवान रेसिपी, होळीचा मेनू आणि दाल पकवानची मेजवानी का ठेवावी, आशा पोस्टस् व सजेशन होते. विशेष म्हणजे त्रिपाठी दांपत्याने त्यापूर्वी उभ्या आयुष्यात कधीही दाल पकवान गुगल केले नाही किंवा त्यासंबंधी कोणताही व्हिडिओ पाहिलेला नव्हता. या विषयावर प्रथमच ते आपापसात बोलले आणि पत्नीची संपूर्ण फेसबुक वॉल ‘दाल पकवान’ने भरली होती. हे फक्त Android मोबाईलमध्ये झाले. नितीन त्रिपाठी यांच्या आयफोनमध्ये मात्र तसे काही झाले नाही.

 

होळीनंतर पुन्हा त्रिपाठी दाम्पत्याची चर्चा झाली ती वय होत असल्याबाबत. सर्व कर्मचारी होळीच्या वेळी सुट्टी घेतात, त्यामुळे जास्त मेहनत करावी लागते, अशी चर्चा झाली. पुढच्या वर्षीपासून सुट्या कमी करू असे या जोडप्याने ठरविले. त्यानंतर फेसबुक चेक केले तर, पुन्हा फेसबुकवर होळीसाठी केटरर, साफसफाईची सेवा इत्यादी सर्व जाहिराती होत्या.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्रिपाठी यांना दुखापत झाली. डॉक्टरांकडे जावे लागणार होते. मिसेस त्रिपाठी यांनी अनेकवेळा ड्रायव्हरला फोन केला; पण होळीचे सेलिब्रेशन सुरूच असल्याने त्याने दुसऱ्या दिवशी फोन काही उचललाच नाही. दुखऱ्या अवस्थेत त्रिपाठी स्वतः गाडी चालवून हॉस्पिटलला पोहोचले. त्यांच्या पत्नीला ड्रायव्हरचा खूप राग येत होता. आता जरा गेस करा, लावा अंदाज, काय बारे झाले असेल? आता तयांच्या फेसबुकवर एक दिवसासाठी, होळीसाठी ड्रायव्हर भाड्याने मिळण्याची जाहिरात दिसत होती.

हे सुद्धा वाचा : 

एकनाथ शिंदे यांना लोकांचे शिव्याशाप सोसवेना, फेसबुक पेजवरील कमेंट बॉक्स केला बंद

आमदार फुटला, पण त्याचे फेसबुक चालवणारा शिवसैनिक नाही फुटला

पाच ट्रेंडस् जे बदलवून टाकतील आपले ऑनलाईन जीवन

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात जसे घडले, अगदी तसेच हे सारे आहे. कदाचित भविष्यात समोर येईलही, की फेसबुक तुमचे बोलणे ऐकायचे आणि त्यानुसार जाहिराती व रिलेटेड कंटेंट दाखवायचे म्हणून! आपल्या बोलण्यानुसार फेसबुकवर जाहिराती व कंटेंट दिसण्याची ही समस्या आयफोनमध्ये दिसली नाही. अॅपलमध्ये iOSच्या शेवटच्या अपडेटसह ही समस्या संपली आहे. Android मध्ये मात्र फेसबुक चर्चा रेकॉर्ड करीत असल्याची ही समस्या भयंकर गंभीर आहे. त्यात प्रायव्हसी भंगाबाबत फारसे सख्त धोरण आणि दंडाची वगैरे तरतूद नसल्यामुळे भारतासारख्या देशातच हे असले ‘नसते उद्योग’ केले जात असतील, यात शंकाच नाही, असे नितीन त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

BeAware Facebook Records Your Talk, फेसबुक ऐकते तुमचे बोलणे, Facebook Privacy, Meta Privacy, Facebook Meta Cookies

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी