33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeजागतिकटोकियो ऑलिम्पिकच्या पदक विजेत्यांनी एकत्र येत गायलं राष्ट्रगीत

टोकियो ऑलिम्पिकच्या पदक विजेत्यांनी एकत्र येत गायलं राष्ट्रगीत

टीम लय भारी

नवी दिल्ल्ली : टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये देशाला गौरव मिळवून देणारे 18 स्टार खेळाडू भारताचे राष्ट्रगीत म्हणण्यासाठी एकत्र आले आहेत जेणेकरून पुढच्या पिढीला खेळासाठी प्रेरणा मिळेल. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (IISM) ने देशाच्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक नायकांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा अनोखा प्रयत्न केला(Tokyo Olympic medalists sing the national anthem together).

या व्हिडिओमध्ये नीरज चोप्रा, रवी कुमार दहिया, मीराबाई चानू, पीआर श्रीजेश, लोव्हलीन बोरगोहेन, सुमित अंतील, मनीष नरवाल, प्रमोद भगत, कृष्णा नगर, भाविना पटेल, निषाद कुमार, योगेश कथुनिया, देवेंद्र झाझरिया, प्रवीण कुमा, सुहास यथिराज, शरद कुमार, हरविंदर सिंग, आणि मनोक सरकार हे खेळाडू दिसत आहेत.

भारताने टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह, भारताने ७ पदके जिंकली, जी आतापर्यंतची सर्वोच्च! ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी होती. पुढील ऑलिम्पिक 2024 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहे(India achieves historic feat at Tokyo Olympic 2021).

हे सुद्धा वाचा

राजशिष्टाचार विभागाची प्रजासत्ताक दिनाची नियमावली जाहीर

यंदा राजपथावरची परेड ठरणार खास! महाराष्ट्रातील जैवविविधतेचे होणार अनोखे दर्शन

Republic Day 2022: Tokyo Olympics Gold medallist Neeraj Chopra awarded Param Vishisht Seva medal

वेटलिफ्टर मीराबाई चानू ने रौप्य पदक जिंकून भारतीय खेळाडूंनी त्यांच्या मोहिमेची चांगली सुरुवात केली. यानंतर भारताने चार कांस्यपदक आणि दुसरे रौप्य पदक जिंकले. भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेचा राष्ट्रीय विक्रम धारक भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून, ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून देत भारताचा मान जगात उंचावला आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताला 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांसह भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 35 पदके मिळवली आहेत. भारतासाठी, राष्ट्रीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे आठ पदके जिंकली आहेत. वैयक्तिक स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंत दोन सुवर्णपदके मिळवली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी