32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजपंकजाताईंसाठी अमित शाह भगवान गडावर घेणार सभा

पंकजाताईंसाठी अमित शाह भगवान गडावर घेणार सभा

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वाधिक हाय होल्टेज लढत परळी मतदारसंघात होणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावंडामध्ये ही लढत होणार आहे. दोन्हीही नेत्यांनी कष्ट उपसायला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजाताईंच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

पंकजाताईंसाठी अमित शाह भगवान गडावर घेणार सभा
भगवान भक्ती गडावर येत्या 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंकजाताईंच्या पुढाकारातून दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यंदा या सोहळ्याच्या कालावधीतच योगायोगाने दसरा आलेला आहे. निवडणुकीचा प्रचार कालावधी आणि दसरा याचे टाईमिंग जुळून आले आहे.
या सोहळ्यासाठी अमित शाह उपस्थित राहणार असल्याने पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजाताईंनी डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळली होती. पायाला भिंगरी लावून त्यांनी डॉ. प्रितम यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.
आता स्वतःच्या प्रचारासाठी सुद्धा पंकजाताई प्रचंड कष्ट उपसत आहेत. अमित शाह यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांमुळे पंकजाताईंना निवडणूक सोपी जाऊ शकेल, असे बोलले जात आहे. जम्मू व काश्मिर राज्यातील कलम 370 रद्द केल्यापासून अमित शाह यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यांच्या विषयी लोकांमध्ये कुतूहल आहे. या कुतूहलापोटी सामान्य लोकांची मोठी गर्दी या दसरा मेळाव्याला होईल, असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी