29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeटॉप न्यूजTokyo Paralympics : राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अवनी लेखराला बक्षीस

Tokyo Paralympics : राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अवनी लेखराला बक्षीस

टीम लय भारी

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिकसमध्ये भारताच्या अवनी लेखराने सुवर्णपदकाची कमाई केली आहे . तिने पॅरालिम्पिक स्पर्धेच्या नेमबाजीमध्ये उत्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले . तिच्या या कामगिरीमुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोट यांनी तिला बक्षीस जाहीर केले आहे (Ashok Gehlot announced the reward to Avni Lekhara).

गेहलोट यांनी अवनीला ३ करोड रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे . त्याचबरोबर देवेंद्र झाझरीया याला रोप्य पदकाची कमाई केल्यामुळे २ करोड रुपयांचे बक्षीस. तर सुंदरसिंग गुर्जर याला कांस्य पदक जिंकल्यामुळे १ करोड रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

Tokyo Paralympics : अवनी लेखराने भारतात इतिहास रचला, नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले

सिंधूने भारताला मिळवून दिले कांस्यपदक

अवनीने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९. ६ गुण मिळवत सुवर्णपदक कमावले . याआधीच्या पात्रता फेरीत ६२१. ७ गुण मिळवत ती सातव्या स्थानावर होती. पॅरालीम्पिकच्या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे . वयाच्या १९ व्या वर्षी अवनीने ही सुवर्णपदकाची कमाई केली आहे . अवनीने अंतिम फेरीत चीनची नेमबाज झांगनेचा पराभव केला . झांगने हिने २४८. ९ गुण मिळवत, रोप्य पदक पटकावले आहे .

Ashok Gehlot announced the reward to Avni Lekhara
अवनी लेखराने केली सुवर्णपदकाची कमाई

राष्ट्रीय क्रीडा दिनी पॅरालिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या चंदेरी गर्लची कहाणी

Shooter Avani Lekhara First Indian Woman To Win Gold At Paralympics

अवनी लेखरा ११ वर्षांची असताना, तिचा अपघात झाला होता . या अपघातात तिच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती त्यामुळे तिला अर्धांगवायू झाला होता . अवनी राजस्थानच्या जयपूर येथे राहते. स्वतःच्या शारीरिक परिस्थितीवर मात करत तिने नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी