27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeटॉप न्यूजVIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी

VIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी

टीम लय भारी

मुंबई : मंत्रालयातील व्हरांड्यात लोकांचा मोठा घोळका आहे… घोळक्याच्या मधोमध मंत्री आहेत… लोकं मंत्र्यांकडे आपल्या समस्यांची निवेदन देत आहेत… मंत्री निवेदन घेऊन वाचत आहेत, त्यावर शेराही मारत आहेत… निवेदन देणाऱ्यांची संख्या संपत नाही, अन् मंत्रीही निवेदने स्विकारताना थकत नाहीत… काहीजण आपले गाऱ्हाणे मंत्र्यांना सांगत आहेत, मंत्री ते गाऱ्हाणे ऐकत आहेत… नवल वाटावे असे चित्र मंगळवारी मंत्रालयात पाहायला मिळाले. शालेय शिक्षण व जलसंधारण राज्यमंत्री बच्चू कडू यांची ही कार्यपद्धत पाहून भेटायला आलेले लोक सुद्धा भारवून गेले.

जमिनीवर पाय असलेले लोकप्रतिनिधी म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. आमदार असताना सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी ते तळागाळात फिरायचे. रस्त्यावरील आंदोलने करायचे. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी आपले पाय जमिनीवरच राहतील याची काळजी घेतली आहे. समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे गाऱ्हाणे ते ऐकून घेतात, आणि ती समस्या सोडविण्यासाठी मदतही करतात. मंगळवारी सुद्धा त्याचाच प्रत्यय आला.

VIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी

मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर बच्चू कडू यांचे दालन आहे. त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांची दालनात व दालनाबाहेर मोठी गर्दी असते. मंगळवारी सुद्धा तुडुंब गर्दी होती. दालनात बसून बच्चू कडू यांनी भेटायला आलेल्यांची गाऱ्हाणी ऐकली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना एका बैठकीसाठी बाहेर जायचे होते. म्हणून ते दालनाबाहेर आले. पण बाहेरसुद्धा तुडुंब गर्दी होती. मग त्यांनी व्हरांड्यात लोकांमध्ये उभे राहूनच गाऱ्हाणी ऐकायला सुरूवात केली.

VIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळांच्या ओएसडीने महिलेला कार्यालयाबाहेर हाकलले, महिलेने घातला गोंधळ !

धनगर समाजासाठी अजितदादांकडे १ हजार कोटींची मागणी; धनगर शिष्टमंडळाचा आग्रह, आरक्षणाबाबतही दिले आश्वासन

जनतेच्या कामांसाठी उपाशीपोटी मंत्रालयात धावपळ करणाऱ्या आमदारांची आरोग्य मंत्र्यांच्या दालनाच तब्येत बिघडली

एकाच दालनात दोन मंत्र्यांचा कारभार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी