29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeटॉप न्यूजTokyo Paralympics : बॅडमिंटनपटू सुहास यथिराजचे रौप्य पदक निश्चित, सुवर्ण जिंकण्यापासून एक...

Tokyo Paralympics : बॅडमिंटनपटू सुहास यथिराजचे रौप्य पदक निश्चित, सुवर्ण जिंकण्यापासून एक पाऊल दूर

टीम लय भारी

टोकियो : भारतीय बॅडमिंटनपटू आणि गौतम बुद्ध नगर जिल्हा दंडाधिकारी सुहास एल. यथिराज यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. एसएल 4 प्रकारात त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे (Badminton player Suhas Yathiraj silver medal confirmed).

नुकताच भारताने बॅडमिंटनमध्ये एक पदक निश्चित केले. भारताचे हे दुसरे पदक आहे. प्रमोद भगतनंतर आता भारताचा सुहास यथिराज यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचे तिकीट मिळवले आहे. त्यामुळे आता रौप्य पदक निश्चित झाले असून सुवर्ण पदकाची आशाही निर्माण झाली आहे.

Tokyo Paralympics : वयाच्या 18 व्या वर्षी रचला इतिहास, प्रवीण कुमारला उंच उडीत रौप्य पदक

Tokyo Paralympics : भारताचा थाळीफेकपटू विनोद कुमारला परत करावे लागणार कांस्य पदक

सुहासला सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. आता रविवारी अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या लुकास मजूरशी त्याचा सामना होईल, ज्याने उपांत्य फेरीत भारताच्या तरुण ढिल्लनचा पराभव केला (Who defeated India young Dhillon in the semifinals).

Badminton player Suhas Yathiraj silver medal confirmed
सुहास यथिराजला सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे

Tokyo Paralympics : राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अवनी लेखराला बक्षीस

paralympics: Pramod Bhagat, Suhas Yathiraj storm into badminton finals

38 वर्षीय सुहासने पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूवर सहज विजय मिळवत पुढील फेरी गाठली. सुहास यांनी इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट  21-9 तर दुसरा सेट 21-15 ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झाले आहे. पण या पदकाला सुवर्णपदकात बदलण्याची सुवर्णसंधी सुहास यांना रविवारी असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी