32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजबाळासाहेब थोरातांच्या पाठपुराव्यातून संगमनेर मधील पठार भागासाठी 28 लाखांचा निधी

बाळासाहेब थोरातांच्या पाठपुराव्यातून संगमनेर मधील पठार भागासाठी 28 लाखांचा निधी

टीम लय भारी

संगमनेर : महाविकास आघाडी सरकार मधील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात विकास कामांचा वेग कायम राखला आहे. डोंगरी विकास निधीतून बोटा व पठार भागासाठी 28 लाख रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती जि.प.सदस्य व गटनेते अजय फटांगरे यांनी दिली आहे(Balasaheb Thorat pursuit, Funding for hill development work).

याबाबत अधिक माहिती देताना अजय फटांगरे म्हणाले की, थोरात यांनी महत्त्वपूर्ण निळवंडे धरणाच्या कालव्यांबरोबर संगमनेर शहरात अनेक मोठमोठी विकास कामे मार्गी लावली आहेत. वाडीवस्तीवर विकासकामांचा वेग कायम ठेवताना रस्ते ,पाझर तलाव दुरुस्ती, पानंद रस्ते, लाईट व्यवस्था यासाठी मोठा निधी मिळवला आहे. डोंगरी विकास निधीमधून बोटा व पठार भागासाठी 28 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

फटांगरे पुढे म्हणाले की, पठार भागातील सातत्याने होणाऱ्या विकास कामांसाठी आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजित भाऊ थोरात यांची मोठी मदत राहिली आहे. या निधीतून बोटा माळवाडी येथे सात लाखाचा सभामंडप, कुरकुंडी येथे सात लाखांचा सभामंडप, पोखरी बाळेश्वर येथे सात लाखांचा सभामंडप, व पिंपळगाव माथा येथे सात लाखांचा सभामंडप बांधण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने भाजपला मागे टाकले !

महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना जाहीर

काँग्रेसचा विचार हा देशाच्या प्रगतीचा आणि माणसाच्या उन्नतीचा आहे : बाळासाहेब थोरात

Maharashtra local body polls: Sena-NCP-Congress alliance wins, BJP emerges as single largest party

थोरात यांनी पठार भागावर काय प्रेम केले असून विविध विकास कामांसाठी मोठा निधी दिला आहे. आपण सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून गावागावात विकासाच्या योजना राबविल्या जात असून बोटा गट हा आदर्श व मॉडेल बनवला आहे(Balasaheb Thorat loves about the plateau).

हा निधी दिल्याबद्दल माळवाडी,बोटा, कुरकुंडी ,पोखरी बाळेश्वर, पिंपळगाव माथा येथील ग्रामस्थांनी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे इंद्रजीत भाऊ थोरात व जि प सदस्य, अजय फटांगरे यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी