36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटॉप न्यूजभारतीय सैनिकही करतात चिन्यांसारखीच घुसखोरी; भालचंद्र नेमाडेंचे वादग्रस्त विधान

भारतीय सैनिकही करतात चिन्यांसारखीच घुसखोरी; भालचंद्र नेमाडेंचे वादग्रस्त विधान

चिनी सैनिकआपल्याकडे येतात मारामाऱ्या करतात हे चुकीचे आहे. मात्र, आपलेही सैनिक तेच करतात असं वादग्रस्त विधान देखील यावेळी नेमाडे यांनी केले.

मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या नावाची एक वेगळी छबी त्यार करणारे प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. जळगावमधील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधत असताना भालचंद्र नेमाडे यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी नेमाडे म्हणले की, आपण कोणाला निवडून देतो, ज्यांना आपण निवडून देतो ती माणसे कोण आहेत, ती काय करतात याचा विचार करण्याची सध्या जनतेला गरज आहे. शिवाय पुढे बोलताना आपण ज्या हरमखोर लोकांना निवडून देतो त्याचेच हे फळ आहे असे खळबळजनक विधान देखील नेमाडे यांनी केले. सोबतंच चिनी सैनिकआपल्याकडे येतात मारामाऱ्या करतात हे चुकीचे आहे. मात्र, आपलेही सैनिक तेच करतात असं वादग्रस्त विधान देखील यावेळी नेमाडे यांनी केले.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण दुषित झाले असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. याबाबत बोलत असनाता नेमाडे म्हणाले की सध्य परिस्थितीत राजकारणात सामान्य माणसाने पडू नये अशी स्थिती उद्भवली आहे. यावर उपाय काय यासाठी आता सामान्य माणसानेच विचार करण्याची गरज आहे. शिवाय सध्याची जी परिस्थिती आहे ती केवळ आपण ज्या हरामखोर लोकांना निवडून दिले त्याचे हे फळ आहे असं नेमाडे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

VIDEO: एका लग्नाची नवलाई, काकांनी गायल्या इंग्रजीत मंगलाष्टका

विजय सेतुपतीने एका महिन्यात इतके वजन कमी केले की चाहत्यांना ओळखणे झाले कठीण

महाविकास आघाडीच्या महामोर्चाचा फटका सुन्नी दावते इस्लामीला, तीस वर्षांची परंपरा खंडित होणार

राज्यात एकीकडे 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोक भुकेलेली आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला खोक्यांची भाषा चालते का? असासंतप्त सवाल देखील यावेळी नेमाडे यांनी उपस्थित केला. सध्याच्या स्थितीत काय चांगले आणि काय वाईट यातील फरक कळेनासा झाला आहे. अशी लोकशाही असले तर त्या लोकशाहीचा काय फायदा त्यामुळे सध्यातरी चांगल्या लोकांनी राजकारणात पडू नये असं म्हणत नेमाडे यांनी आपले मत व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी पुढे बोलताना नेमाडे म्हणाले की, लोक जर असेच मुर्खपणाने वागत राहिले तर अशीच सरकारे येत राहणार आणि यामुळे पर्यायाने आपल्या देशाचे नुकसान होत राहणार. आजवरच्या इतिहासात मुसलमानांपासून प्रत्येक माणसाने या देशाला प्रगतीपथावर आणण्यास हातभार लावला आहे. पाकिस्तान आणि चीनमध्ये अतिशय गरीब परिस्थितीत लोक जिवन गजगत आहेत. पाकिस्तानातील गरीब स्त्रिया आपल्या लहान मुलांना हातात घेऊन कामाला जातात. चिनी सरकार आपले क्षत्रू असेल पण तीन हा आपला क्षत्रू आहे असे म्हणणे चुकूचे ठरेल. चिनी सैनिकआपल्याकडे येतात मारामाऱ्या करतात हे चुकीचे आहे. मात्र, आपलेही सैनिक तेच करतात असं वादग्रस्त विधान देखील यावेळी बोलताना नेमाडे यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी