30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूज“हेलिकॉप्टर अपघातानंतरही सीडीएस रावत जिवंत होते; अग्निशमन कर्मचाऱ्याचा दावा

“हेलिकॉप्टर अपघातानंतरही सीडीएस रावत जिवंत होते; अग्निशमन कर्मचाऱ्याचा दावा

टीम लय भारी

नवी दिल्ली: तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातानंतर सीडीएस जनरल बिपिन रावत जिवंत होते आणि त्यांनी त्यांचे नाव ही सांगितले होते असे एका अपघाताच्या ठिकाणावरील व्यक्तीने म्हटले आहे(Bipin Rawat: He was still alive after the helicopter crash)

मदत आणि बचाव पथकातील पहिल्यांदा हेलिकॉप्टरच्या विखुरलेल्या ढिगाऱ्याजवळ पोहोचल्याचा व्यक्तीने हा दावा केला आहे. अपघातानंतर, मदत आणि बचावासाठी तेथे पोहोचलेल्या टीममध्ये सामील असलेल्या एनसी मुरली नावाच्या बचाव कर्मचाऱ्याने ही माहिती दिली आहे.

कोरोना लस संशोधनातील ‘भीष्माचार्य’ काळाच्या पडद्याआड

टाटा मोटर्सच्या कमर्शिअल वाहनांच्या किंमती १ जानेवारीपासून वाढणार

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार “आम्ही दोन लोकांना जिवंत वाचवले, त्यापैकी एक सीडीएस बिपिन रावत होते. त्यांनी हळू आवाजात आपले नाव सांगितले. रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी जिवंत बचावलेल्या दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही,” असे एनसी मुरली यांनी सांगितले.

बचावकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सीडीएस जनरल रावत यांच्या शरीराचा खालचा भाग जळाला होता. त्यानंतर त्यांना बेडशीट गुंडाळून रुग्णवाहिकेत नेण्यात आले. एनसी मुरली अग्निशमन दलाचा भाग होता. तेथे पोहोचलेल्या मदत पथकाने हे देखील सांगितले की जळत्या विमानाचे ढिगारे विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या इंजिनला नेण्यासाठी रस्ता नव्हता. ते आजूबाजूच्या घरातून आणि नद्यांमधून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. हे ऑपरेशन खूप कठीण होते.

ओमायक्रॉन: आदित्य ठाकरेंचं केंद्राला पत्र, लसीकरणाबद्दल मागण्या करताना म्हणाले….

CDS Bipin Rawat Dies in Helicopter Crash LIVE Updates: Rajnath Singh to inform Parliament today; black box retrieved

बचावकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळाजवळ झाडेही होती. कठीण परिस्थितीमुळे बचावकार्यात वेळ लागत होत होता. बचावकर्त्यांना १२ जणांचे मृतदेह सापडले, तर दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. वाचलेले दोघेही मोठ्या प्रमाणात भाजले होते. जिवंत सुटका करण्यात आली, त्याचे नाव ग्रुप कॅप्टन वरुण सिंग असे आहे. भारतीय हवाई दल हेलिकॉप्टरच्या तुटलेल्या भागांबाबत बचाव पथकाला सतत मार्गदर्शन करत होते.

या हेलिकॉप्टरचा ज्या ठिकाणी अपघाता झाला ते ठिकाण कटेरी गावापासून १०० मीटर अंतरावर आहे. गावात राहणाऱ्या पोथम पोनम यांना हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी ते जात असल्याचा आवाज आला होता. ते म्हणाले की यानंतर काही वेळात मोठा स्फोट झाला आणि हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली.

काटेरी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या भागातील वीज त्वरित खंडित करण्यात आली. मात्र, या लोकांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी अडवले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी