33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजनव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; ‘या’ वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ

नव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; ‘या’ वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ

टीम लय भारी

नवी दिल्ली : नव्या वर्षात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये अनेक वस्तू आणि सेवांवरील जीएसटीमध्ये वाढ होणार आहे. जीएसटी वाढल्याने वस्तूंचे दर देखील आपोआप वाढतील. आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. त्यातच येणाऱ्या काळात खाद्यपदार्थ, कपडे आणि ऑनलाईन खरेदी महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे(GST Increase in new year, items will be more expensive).

कपडे महागणार

कपडे आणि चामड्यांच्या उत्पादनावरील जीएसटीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या कपड्यांवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येतो. मात्र आता तो वाढून बारा टक्के करण्यात येणार आहे. एक जानेवारी 2022 पासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. जीएसटी वाढल्यामुळे आपोआपच कपडे आणि चामड्याची उत्पादने जसे की चपला, पर्स पाकिटे इत्यादी महाग होतील.

‘मुघल निर्वासित आहेत’ म्हटल्याबद्दल नसीरुद्दीन शाह मोठ्या प्रमाणात ट्रोल

मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?

ओला उबेरची प्रवासी सेवा

ओला उबेरची प्रवासी सेवा देखील येत्या एक जानेवारीपासून महागणार आहे. ओला उबेरच्या राईडसाठी तुम्हाला आता पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागू शकतात. मात्र इतर प्रवासी वाहनाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन फूड डिलेव्हरी

स्विगी, झोमॅटो सारख्या ऑनलाईन फूड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्यांना देखील जीएसटीच्या कक्षेत आणले जाणार आहे. ऑनलाईन फूडवर देखील जीएसटी लावण्यात येणार असल्याने ऑनलाईन फूडसाठी ग्राहकांना आता अधिक पैसे माजोवे लागतील.

रविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम,लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

Inflation period opens a window to make some promising bets

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी