28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयकेंद्रीय मंत्र्यांची महाविकास आघाडीवर खोचक टीका

केंद्रीय मंत्र्यांची महाविकास आघाडीवर खोचक टीका

टीम लय भारी

नवी दिल्ली:- कोरोनाकाळात ठाकरे सरकारने केंद्र सरकारवर अनेक टीका केल्या होत्या. त्यानंतर राज्यात भाजपा नेत्यांनी केंद्र सरकारची बाजु मांडत  महाराष्ट्र सरकार काहीच करत नसल्याचे म्हटले होते. त्यांनतर आता पुन्हा भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.(Union Ministers sharply criticize Mahavikas Aghadi)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्याच्या काही तास आधी अर्थ राज्यमंत्री भागवत किशनराव कराड म्हणाले की, अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना अनुकूल असेल. आजचा दिवस हा देशासाठी महत्त्वाचा आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थमंत्र्यांची घोषणा, वर्षभरात देशात 5G सेवा सुरू करणार

पुढील तीन वर्षांत भारतात “400 वंदे भारत ट्रेन” येणार

अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा

“Surprise Element”: BJP Fields Union Minister Versus Akhilesh Yadav In UP

भारत समृद्ध होण्यासाठी, मोदींच्या नेतृत्वाखाली देश विश्वगुरु बनण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. महाविकास आघाडी नेहमीच चुकीचे बोलते. स्वतः काही करत नाही फक्त केंद्राकडे बोट दाखवणे हेच त्यांचे काम आहे. कोविडच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली एक गोष्ट दाखवावी.

केंद्र सरकारने केलेल्या १० गोष्टी मी सांगू शकतो. आम्ही आमची लस देऊ असे महाराष्ट्र सरकारने सांगितले होते पण त्यांनी कोणती लस दिली? केंद्राने १५० कोटी लोकांसाठी लस दिली आहे पण महाराष्ट्र विकास आघाडीने काही केलेले नाही,” अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली.

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी प्रार्थना केली. हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना अनुकूल ठरेल, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “प्रत्येक गट – मग तो विरोधी पक्षाचा सत्ताधारी असो – एकत्र बसून अर्थसंकल्प सादर करताना ऐकावे आणि सहकार्य करावे, अशी पंतप्रधान मोदींची अपेक्षा आहे.”“प्रत्येकाने मग तो विरोधी पक्ष असो वा सत्ताधारी एकत्र बसून अर्थसंकल्प सादरीकरण ऐकावे आणि सहकार्य करावे, अशी पंतप्रधान मोदींची अपेक्षा आहे,” असेही भागवत कराड म्हणाले. २०२२ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी त्यांच्या घरी पूजादेखील केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी