29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeटॉप न्यूजभाजपच्या ‘या’ मुख्यमंत्र्याला आणि कन्येला कोरोना

भाजपच्या ‘या’ मुख्यमंत्र्याला आणि कन्येला कोरोना

टीम लय भारी

बंगळुरू : भाजपच्या नेत्यांना एकापाठोपाठ कोरोनाची लागण सुरुच आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाली आहे. तिला बंगळुरुच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. येडियुरप्पा यांनी काल रात्री ट्विटकरुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे असे येडियुरप्पा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

येडियुरप्पा यांना सुद्धा मणिपाल रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचे रुग्णालयांनी डॉक्टरांनी सांगितले. मणिपाल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. येडियुरप्पा ७८ वर्षांचे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही कोरोना चाचणीचा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो,” असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी