31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजप्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार कुंभमेळा नियोजन

प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार कुंभमेळा नियोजन

महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळा < Kumbh mela > तयारीला आस्ते कदम का होईना सुरुवात केली असून भाविकांची गर्दी व त्याचे नियोजन या विषयावर फोकस केला आहे. त्याच अनुषंगाने यंग फ्रेडंस असोसिएशन या संस्थेने महापालिकेस प्रयागराज या ठिकाणी केलेल्या कुंभमेळा नियोजनाचे सादरीकरण केले. प्रामुख्याने पर्वणीच्या दिवशी होणारी गर्दीचे नियोजन कसे असावे याची माहिती दिली. या अगोदर देखील दोन ते तीन संस्थांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण केले आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर कुंभमेळा नियोजनासाठी कोणत्या संस्थेसोबत काम करावे, याचा निर्णय घेतला जाईल.यामध्ये प्रामुख्याने गर्दी नियंत्रण, स्वछता व्यवस्था आदिचा समावेश होता.(Kumbh Mela to be held in Nashik on the lines of Prayagraj)

नाशिकमध्ये २०२७ – २८ या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून तयारीला अवघे तीन वर्ष उरले असून महापालिकेकडून प्राथमिक स्तरावर कामाला सुरुवात झाली आहे. शासनानेही समित्या गठित केल्याने कामाला उशीराने का होईना गती आली आहे. महापालिकेने सिंहस्थासाठी एकूण अकरा हजार कोटींच्या विकासकामांचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. सिंहस्थात नाशिकला दोन कोटी भाविक व पर्यटक येण्याचा अंदाज मनपाने धरला ‌आहे. ऐवढ्या मोठ्या संख्येने येणार्‍या गर्दीचे नियोजन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. यंग फ्रेडंस असोसिएशनने प्रयागराज या ठिकाणी झालेल्या कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजन केले होते. त्यात प्रामुख्याने रोगराई पसरु नये यासाठी स्वच्छता, आरोग्य सुविधा, पर्वणीच्या दिवशी होणार्‍या गर्दीचे नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था याबाबत सूचना दिल्या होत्या. तेथील राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करत कुंभमेळा यशस्वी पार पाडला. त्याचे सादरीकरण या संस्थेने मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंझारी, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांना केले. देशात नाशिकसह उज्जैन, हरिद्वार व प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरतो. पण वरील ठिकाणी नदीचे पात्र मोठे असून घाटही प्रशस्त आहेत. त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहते. याऊलट गोदावरी मुख्य शहरातून वाहत असून तिचे पात्र छोटे आहे. नदिकडे येणारे रस्तेही प्रचंड अरुंद असून या अगोदर चेंगराचेंगरिची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे इतर ठिकाणांच्या तुलनेत नाशिकची भौगोलिक परिस्थिती भिन्न असल्याने गर्दी नियंत्रणांसह इतर बाबींवर काम होणे गरजेचे आहे. त्यात प्रामुख्याने रोगराई पसरु नये यासाठी स्वच्छता, आरोग्य सुविधा, पर्वणीच्या दिवशी होणार्‍या गर्दीचे नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावर या संस्थेने फोकस करत कुंभमेळ्याचे नियोजन कसे शक्य आहे याबाबत सादरीकरण केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी