29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजनरेंद्र मोदींच्या प्रचार सभांना साताऱ्यातून सुरूवात, राहूल गांधी मात्र परदेशात

नरेंद्र मोदींच्या प्रचार सभांना साताऱ्यातून सुरूवात, राहूल गांधी मात्र परदेशात

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींच्या सभांना 17 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रात एकूण 9 सभा ते घेणार आहेत. अमित शाहांच्याही 18 सभा राज्यात होणार आहेत.

नरेंद्र मोदींची पहिली सभा साताऱ्यात होणार आहे. त्याच दिवशी ते पुण्यातही दुसरी सभा घेतील. अन्य सभांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे यांच्या करीता, तर विधानसभेच्या अन्य उमेदवारांकरीता नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. साताऱ्यात भाजपचा एकही आमदार नाही. दुसऱ्या बाजूला सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे साताऱ्यात भाजपची पाळेमुळे घट्ट करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. या अनुषंगानेच नरेंद्र मोदी यांची पहिली सभा साताऱ्यात आयोजित केली असल्याच सूत्रांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी नुकतेच परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे प्रचार काळात त्यांच्या सभा होणार किंवा नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याही सभांबाबत अद्याप काँग्रेसकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु येत्या दोन – चार दिवसांत केंद्रीय नेत्यांच्या सभांबाबत काँग्रेसकडून माहिती जाहीर केली जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी