27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजखासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर

खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर

टीम लय भारी

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याही वर्षी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार सुळे यांनी सलग सातव्या वर्षी पटकावला असून गेल्या वर्षी त्यांना याच संस्थेने संसद महारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते(Supriya Sule awarded Parliamentary Award for the seventh year).

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फौंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. गेल्या बारा वर्षांपासून संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ मार्च रोजी दिल्ली येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, असे के. श्रीनिवासन म्हटले आहे.

१७व्या लोकसभेतही खासदार सुप्रिया सुळे यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर ८ खासगी विधेयकेही सुप्रिया सुळे यांनी संसदेत सादर केली आहेत.

हे सुद्धा वाचा 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी डीआरडीओची उडवली खिल्ली

खासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट, अन् पोलिसांची पळापळ

बाप-लेकीचं नातंच वेगळं! बाबांच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे… 

NCP’s Supriya Sule Among 11 MPs To Be Conferred With Sansad Ratna Awards

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी