30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeटॉप न्यूजगान कोकिला स्व.लताताई यांना मुंबई पोस्ट विभागाकडून विशेष कव्हर क्वीन ऑफ मेलोडीज...

गान कोकिला स्व.लताताई यांना मुंबई पोस्ट विभागाकडून विशेष कव्हर क्वीन ऑफ मेलोडीज चे लोकार्पण

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : भारतरत्न गान कोकिला स्वर्गीय लताताई मंगेशकर यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ आज ता.1 रोजी मुंबई जीपीओ येथे विशेष कव्हर क्वीन ऑफ मेलोडीज चे लोकार्पण त्यांचा भाचा आदित्यनाथ मंगेशकर आणि त्यांच्या पत्नी कृष्णा मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी चीफ पोस्ट मास्टर जनरल वीणा श्रीनिवासन, पोस्ट मास्टर जनरल मुंबई स्वाती पांडे, निदेशक डाकसेवा महाराष्ट्र कैय्या अरोरा उपस्थित होते. रूपेश म्हात्रे यांनी लताताई मंगेशकर यांचे सुंदर रांगोळी चित्र काढून त्यांना श्रद्धाजंली अर्पण केली तर अर्चना टीकम आणि सोनल मेहेर यांनी लता दिदींची गीते गात त्यांची आठवण जागृत केली.(Sur Kokila Lata Mangeshkar Mumbai PostDepartment Special cover queen)

या विशेष कार्यक्रमाबद्दल  स्वाती पांडे (पोस्ट मास्टर जनरल मुंबई) आम्ही खास लताताई यांच्या निवासस्थानावर म्हणजेच प्रभुकुंज वरविशेष मुखपृष्ठ निर्माण केले आहे. लता मंगेशकर यांच्या गौरवशाली जीवन आणि कारकिर्दीला हि पोस्ट खात्याची श्रद्धांजली आहे.ज्यांचे भारतीय संगीतातील योगदान अमर्याद आहे.

आठ दशकांहून अधिक काळ देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.तिने आपल्या मधुरतेचा आणि स्वर्णमयी आवाजाचा देशाला अभिमान वाटला. चीफ पोस्ट मास्टर जनरल वीणा श्रीनिवासन -स्पेशल कव्हर क्वीन ऑफ मेलोडीजसह भारतीय संगीताच्या उत्क्रांतीचे वैशिष्ट्यीकृत आहे.लता दीदींना समर्पित विशेष रद्दीकरण कॅशेसह उपस्थित असेल.”लता दीदी यांनी गत तीन पिढ्यांचे देशप्रेम जागवीत मनोरंजन केले.त्यांच्या आवाजातील सौंदर्य आणि उत्कंठा प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर राज्य कररीत आहे.

हे सुद्धा वाचा

लता मंगेशकर यांच्या गाण्यांची ‘स्वरमैफल’, महान गायिकेला वाहणार स्वरांजली

Lata Mangeshkar : लता मंगेशकरांनी सांगितली रेडिओवरील पहिल्या गाण्याची आठवण !

Lata Mangeshkar : लता मंगेशकरांनी सांगितली रेडिओवरील पहिल्या गाण्याची आठवण !

India’s Sur Kokila – Celebrating the magnificence of Lata Mangeshkar

संपूर्ण जग,संगीताची शाळा,त्यांचे कार्य आम्हाला प्रेरणा देत राहील,आज उद्या आणि प्रत्येक दिवशी आपल्या जीवनात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देत राहील.हे विशेष कव्हर आमच्याकडून भारतीय संगीताच्या सुवर्णयुगाची प्रशंसा आहे.”  लतादिदींना मुंबई पोस्टाची अनोखी सलामी स्पेशल कव्हर क्वीन ऑफ मेलोडीजचे लोकार्पण करताना आदित्यनाथ मंगेशकर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी