30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्राईमईडीने शोधली अनिल जयसिंघानी याची 100 कोटींची मालमत्ता

ईडीने शोधली अनिल जयसिंघानी याची 100 कोटींची मालमत्ता

ईडीने क्रिकेट बुकी अनिल जयसिंघाणी याची 100 कोटींची मालमत्ता शोधली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ही खंडणी क्रिकेट बुक्की अनिल जयसिंघनी याने मागितली होती. अनिल सध्या कोठडीत आहे. ईडी आता त्याचा नव्याने तपास करत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याबाबात मलबार हिल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. ही खंडणी क्रिकेट बुक्की अनिल जयसिंघाणी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांनी मागितली होती.अमृता यांना ब्लॅकमेल करून ही खंडणी मागण्यात आली होती. हे प्रकरण बरंच गाजत आहे.

याच अनिल जयसिंघानी याची आता ईडीही चौकशी करत आहे. ईडीने त्याच्या 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा शोध घेतला आणि कारवाई सुरू केली आहे. ईडीने 2015 सालात गुन्हा दाखल केला होता.याचा तपास ईडीच्या अहमदाबाद झोनचे अधिकारी करत आहेत. या गुन्ह्यात मुंबईतील दोन बुकी आणि पाच अंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. याच गुन्ह्यात अनिल जयसिंघानी हा देखील आरोपी आहे. मात्र, तो 2015 पासून फरार होता.आता त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या तळोजा जेल मध्ये आहे.

अनिल जयसिंघानी सापडल्यानंतर 2015 सालातील गुन्ह्याचा आता पुन्हा तपास सुरू झाला आहे. अहमदाबादच्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी विशेष ईडी कोर्टातून त्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र,आरोपी आजारी असल्याचं कारण सांगत कोर्टाने ताबा देण्यास नकार दिला होता. यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुजरात हायकोर्टतून अनिल जयसिंघानी याचा ताबा मिळवला आहे आणि तपास सुरू केला आहे.

हे देखिल वाचा

13 श्री सेवकांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : रेखा ठाकुर यांची मागणी

मराठा आरक्षण प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका!

अखेर सरकारला जाग आली ; खारघर घटनेच्या चौकशीसाठी नेमली एकसदस्यीय समिती !

ही घटना 2015 सालातील आहे. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास जे पी सिंग हे अधिकारी करत होते. एकूण दोन गुन्ह्याचा तपास सुरू होता. एक गुन्हा 2600 कोटी बेटिंगचा होता तर दुसरा गुन्हा 5000 कोटी रुपयांच्या हवालाचा होता. तेव्हा या गुन्ह्याचे तपास अधिकारी सिंग यांच्या विरोधात जयसिंघाणी आणि इतरांनी अनेक तक्रारी सीबीआयकडे केल्या होत्या. त्याचा परिणाम सिग यांच्यावर कारवाई झाली. त्या नंतर हे प्रकरण थंडावल होत. मात्र आता याचा पुन्हा नव्याने तपास सुरू झाला आहे. यावेळी या प्रकरणात जयसिंघाणी याची 100 कोटींची मालमत्ता शोधून काढल्याच ईडीच्या सूत्रांच म्हणणं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी