32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूज#VidhanSabha 2019 : दीपक केसरकरांचा पराभव करणार, भाजपच्या राजन तेलींचा एल्गार !

#VidhanSabha 2019 : दीपक केसरकरांचा पराभव करणार, भाजपच्या राजन तेलींचा एल्गार !

लय भारी न्यूज नेटवर्क

सावंतवाडी : भाजप, शिवसेना व मित्रपक्षांनी युती जाहीर केली आहे. उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. जागा वाटपानंतर मतदारसंघांमध्ये नाराज इच्छुकांनी आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवारांविरोधातच दंड थोपटले आहेत. सिंधुदुर्गात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपच्या राजन तेली यांनी रणशिंग फुंकले आहे.

कोकणात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे राज्य चिटणीस राजन तेली यांनी शिवसेनेचे केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे.

दीपक केसरकर यांचा पराभव अटळ आहे आणि त्यासाठीच मी रिंगणात उतरलो आहे. 

-राजन तेली 

दीपक केसरकर यांची ही तिसरी टर्म आहे. सावंतवाडी मतदारसंघात दोनदा विजयी झालेला उमेदवार तिसऱ्यांदा विजयी होऊ शकलेला नाही, असा सावंतवाडीचा इतिहास आहे आणि हाच इतिहास पुसण्याचा प्रयत्न दीपक केसरकर यांच्याकडून सुरु आहे. मात्र, शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपनेच यावेळी केसरकर यांच्या पराभवाचा विडा उचलल्याचं चित्र आहे. त्यासाठी राजन तेली हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा तयारीत आहेत. राजन तेली यांनी तसे जाहीर केले आहे.

केसरकरांनी नारायण राणेंचा केला होता पराभव

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावेळी नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा राणेंच्या निशाण्यावरही दीपक केसरकर आहेत. त्यामुळे सध्या सांवंतवाडी मतदारसंघातील राजकारण तापलेले दिसत आहे. आता दीपक केसरकर इतिहास पुसणार की, राजन तेली त्यांना पराभूत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. मात्र राणे कुटुंबियांच्या संभाव्य भाजपा प्रवेशानंतर कोकणात भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी