31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeशिक्षणविद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवणार : वर्षा गायकवाड

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवणार : वर्षा गायकवाड

टीम लय भारी

मुंबई :- मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोटोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.(Varsha Gaikwad will continue online education prevent loss of students)

शालेय शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या, राज्यामध्ये पहिली ते बाटावीच्या शाळा टप्याटप्याने सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?

स्पर्धा परीक्षांचा गोंधळ मिटता मिटेना ! म्हाडा आणि एमपीएससीची एकाच दिवशी परीक्षा

दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरु राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाईन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देश गायकवाड यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

बूस्टर डोससाठी नव्याने नोंदणीची गरज नाही; आरोग्य मंत्रालयाची माहिती

COVID-19: Maharashtra school education minister Varsha Gaikwad tests positive

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी