28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeआरोग्यबूस्टर डोससाठी नव्याने नोंदणीची गरज नाही; आरोग्य मंत्रालयाची माहिती

बूस्टर डोससाठी नव्याने नोंदणीची गरज नाही; आरोग्य मंत्रालयाची माहिती

टीम लय भारी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार, देशभरात आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे.(No new registration equired for booster doses Information, Ministry of Health)

शुक्रवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की पात्र लोक ज्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा समावेश आहेत, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात.

चिंता वाढली असली तरी मुंबई कोरोनाशी लढण्यास सज्ज : किशोरी पेडणेकर

मेडिकल कोट्यात OBC आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

“यासंदर्भातील ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा शुक्रवारपासून सुरू झाली असून शेड्युल आज ८ जानेवारी रोजी प्रकाशित केले जाणार आहे. ऑनसाइट अपॉइंटमेंटसह लसीकरण १० जानेवारीपासून सुरू होईल,” असे एएनआय या वृत्तसंस्थेने मंत्रालयाच्या निवेदनाचा हवाला देत सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी ओमायक्रॉन प्रकाराच्या प्रसारादरम्यान लसीचा बूस्टर डोस देण्याच्या केंद्राच्या निर्णयाची घोषणा केली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर, ओमायक्रॉन रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

बीएमसीचे नवीन नियम सौम्य लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशनला परवानगी

New Registration Not Needed For Covid Vaccine Booster Shot: Centre

ज्या लसीचे दोन डोस पूर्वी घेतले असतील, त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जावा, असे केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केले आहे.

देशात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढ

शुक्रवारी रात्री उशिरा, १,४१,५२५ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. याआधी शुक्रवारी १ लाख १७ हजार नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात २८ डिसेंबरपासून प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या ११ दिवसांत दररोज २० टक्के अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर यातील ४ दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांची वाढ ४० टक्क्यांहून अधिक आहे.देशात गेल्या २४ तासांत करोना विषाणूचे एक लाख ४१ हजार ५२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, २८५  लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात करोनाच्या ओमायक्रॉन बाधितांची ३०७१ प्रकरणे समोर आली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी