23 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरव्हिडीओVIDEO : गायरान भूखंड घोटाळयाप्रकरणी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत

VIDEO : गायरान भूखंड घोटाळयाप्रकरणी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित भूखंड घोटळ्यावरून अधिवेशनात गदारोळ चालू असतानाच आता कृषीमंत्री अब्द्दुल सत्तार यांचा ३७ एकर गायरान जमीन घोटाळा प्रकरण समोर आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित भूखंड घोटळ्यावरून अधिवेशनात गदारोळ चालू असतानाच आता कृषीमंत्री अब्द्दुल सत्तार यांचा ३७ एकर गायरान जमीन घोटाळा प्रकरण समोर आले आहे. योगेश खंडारे नामक मर्जीतल्या एका व्यक्तीला कोर्टाचा आदेश डावलून मंत्री सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यातील ३७ एकर जमीन १७ जून २०२२ रोजी राज्यमंत्री असताना वाटप करण्याचा निर्णय घेतला .
जिल्हाधिकाऱ्यांना अब्दुल सत्तारांचा निर्णय हा सनदशीर नसल्याचे असल्याचे माहीत असल्याने त्यांनी 5 जुलै 2022 ला अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहित या आदेशाचा अंमल केल्यास सुप्रीम कोर्टाचा अनादर होईल, असे कळवून आवश्यक दिशानिर्देश देण्याची मागणी केली होती, असे निरीक्षण हायकोर्टान सुनावणीनंतर नोंदवले आहे. त्यामुळे कृषी मंत्री सत्तारांसोबतच महसूल आणि वन विभागाचे सचिव, अमरावतीचे विभागीय आयुक्त, वाशिमचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि योगेश खंडारे अडचणीत आले आहेत. येत्या 11 जानेवारी 2023 पर्यंत सर्वांना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे सुद्धा पहा : Abdul Sattar : राज्य महिला आयोगाची एन्ट्री, अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा!

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी संपेनात, निवडणूक पत्रावरून होणार चौकशी

अब्दुल सत्तारांकडून कृषी अधिकाऱ्यांची सालगड्यागत अवस्था; संपूर्ण कृषी खाते कृषिमंत्र्यांच्या दावणीला!

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!