33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणबारसू रिफायनरी प्रकरण: आंदोलन चिघळलं! पोलिसांची कोकणवासियांना अमानुष मारहाण; पाहा व्हिडिओ

बारसू रिफायनरी प्रकरण: आंदोलन चिघळलं! पोलिसांची कोकणवासियांना अमानुष मारहाण; पाहा व्हिडिओ

बारसू परिसरात अन्य जिल्ह्यातून सुमारे दोन हजारांचा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला.

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन वाद आता चांगलाच चिघळल्याचं चित्र असून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलक ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आलेले ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच बारसूमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पंचक्रोशीत सशस्त्र पोलीस चोवीस तास पहारा देत असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बारसूपर्यंत कोणीही पोहोचू नये म्हणून धरतळे आणि रंताळे येथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. प्रकल्प परिसरात जाण्यास ग्रामस्थ आणि स्थानिक पत्रकारांनाही मज्जाव करण्यात आला आहे.

बारसू परिसरात अन्य जिल्ह्यातून सुमारे दोन हजारांचा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यां महिलांना पोलिसांनी फरपटत नेल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासाठी मागविण्यात आलेले जेवण आणि पिण्याच्या पाण्याचा टँकरही पोलिसांनी सूचना देऊन मिळू दिला नाही. आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. महिलांनाही अटक करून रत्नागिरीला नेण्यात आले आणि मानसिक छळ करून रात्री बारा वाजता सोडण्यात आले, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

दरम्यान आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदी महापुरुषांची छायाचित्रे गळ्यात घातली असताना पोलिसांनी ती फाडून टाकून मारहाण केली. गावागावात जाऊन पोलिसांनी जमावबंदी आणि तडीपारीच्या नोटिसा आंदोलनकर्त्यांवर आणि प्रकल्पविरोधातील कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांवर बजावल्या. पोलिसांचे अत्याचार सुरूच असून ते तातडीने थांबविण्यात यावेत. प्रकल्प जनहिताचा असल्यास जनतेशी संवाद साधून त्याची माहिती देण्यात यावी आणि ग्रामस्थांच्या शंका, संशय दूर करावा, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. बारसु सोलगावमधील परिस्थिती बघता कमीत कमी हजार पोलीस इथे लाठ्याकाठ्या आणि अश्रुधुरांच्या कांड्या सोबत घेवून फिरत आहेत अस दिसत आहे. राज्य सरकारने एवढीच काळजी खारघरमध्ये घेतली असती तर अनेक जीव वाचले असते, असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा: 

बारसू रिफायनरी प्रकल्प: कोकणात जनआंदोलन पेटणार! वाचा नेमकं प्रकरण

बारसू रिफायनरी प्रकल्प: ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही? मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

बारसू प्रकल्पाबाबत चर्चेतून मार्ग काढा; शरद पवारांचा उदय सामंतांना सल्ला

Barsu Refinery case, police brutally beat up Konkanis, Barsu Refinery Project, Mass Movement to Ignite in Konkan

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी