32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र"तर विरोध करण्याचे कारण नाही"; बारसू रिफायनरीबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती

“तर विरोध करण्याचे कारण नाही”; बारसू रिफायनरीबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. तर काही स्थानिक समर्थन देत आहेत. तर दुसरीकडे याच रिफायनरीवरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमध्येही मतभेद असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे ठाकरे गट विरोध करत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काहीशी मवाळ भूमिका घेत एकप्रकारे रिफायनरीचे समर्थन केले आहे. दरम्यान, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या प्रकल्पावर आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देखील याविषयी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे.

बारसू रिफायनरीमुळे होणाऱ्या विकासाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असण्याचे कारण नाही; मात्र विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही; याची खबरदारी आपण घ्यायला हवी, असे मत त्यांनी अजित पवारांनी व्यक्त केले. दरम्यान बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाविषयी मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. एखाद्या प्रकल्पातून परिसरात कायमचे नुकसान होणार असेल किंवा भावी पिढी बरबाद होणार असेल तर जरूर त्या गोष्टीला विरोध करायला हवा परंतु त्यातून फायदा होणार असेल तर त्या दृष्टीकोनातूनही विचार केला पाहिजे, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले.

कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रान पेटले आहे. ग्रामस्थांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवत आंदोलनाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे ‘बारसू’कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषत: रिफायनरी प्रकल्पाला 70 टक्के स्थानिक शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय करून जोर जबरदस्तीने कुठलाही प्रकल्प राबविला जाणार नाही. हा प्रकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा विकासाचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हे सुद्धा वाचा: 

रिफायनरीला 70% शेतकऱ्यांचा पाठिंबा! कुठलाही लाठीचार्ज झाला नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा

बारसू रिफायनरी प्रकरण: आंदोलन चिघळलं! पोलिसांची कोकणवासियांना अमानुष मारहाण; पाहा व्हिडिओ

बारसू रिफायनरी प्रकल्प: कोकणात जनआंदोलन पेटणार! वाचा नेमकं प्रकरण

Barsu Refinery case, Mass Movement in Konkan, Barsu Refinery Project, CM Eknath Shinde, Barsu Refinery NCP no reason to oppose – Ajit Pawar, Barsu Refinery, NCP, Ajit Pawar, Barsu Refinery Ajit Pawar statement, Barsu Refinery no reason to oppose NCP Ajit Pawar statement

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी