31 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंच्या मतदार संघात विश्व मराठी साहित्य संमेलन; पण ठाकरेंना निमंत्रणच नाही!

आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात विश्व मराठी साहित्य संमेलन; पण ठाकरेंना निमंत्रणच नाही!

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीला उजाळा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत आजपासून सुरू होत असलेल्या पहिल्या विश्व मराठी संमेलनाच्या (vishwa marathi Sahitya Sammelan) नाराजीनाट्याचा प्रयोग उदघाटनापूर्वीच राजकीय व्यासपीठावर सुरु झालेला पाहायला मिळत आहे. या संमेलनाला आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना निमंत्रणच न दिल्याने ठाकरे यांनी तिखट शब्दांत सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने आम्हाला अधिकृतपणे निमंत्रणच दिले नाही. मला काय इतर कोणालाच या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. हे सरकार दिल्लीपुढे लोटांगण घालणारे सरकार आहे. त्यामुळे अशा मिंध्या सरकारकडून अन्य कोणतीही अपेक्षा बाळगणे व्यर्थ असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात म्हणजे वरळीमध्येच (Worli) या संमेलनाचे बिगुल वाजत आहे. (vishwa marathi Sahitya Sammelan in Aditya Thackeray’s constituency; But Thackeray is not invited)

मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. व्यक्तिशः मी कोणालाही निमंत्रण दिलेले नाही. अन्यथा एकाला निमंत्रण दिले आणि दुसऱ्याला नाही असे व्हायचे. त्यामुळे विनाकारण वादाला निमंत्रण द्यायचे नसल्याचे सूचित करत केसरकरांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपाला फारशी किंमत दिली नाही. विश्व मराठी साहित्य संमेलनाची जाहिरात सर्व वृत्तपत्रांमध्ये दिली आहे. “सामना”मध्येही उद्या ही जाहिरात छापून येईल. त्यामुळे आदित्य ठाकरेंना वेगळ्या निमंत्रांची गरज नाही. शिष्टाचारानुसार केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती यांनाच अधिकृतपणे या संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. सरकारी कार्यक्रमांना सर्व आमदार आणि खासदारांनाही बोलवावे लागते. त्यामुळेआदित्य ठाकरे यांचे नाव अतिथींच्या यादीत असल्याचे केसरकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘मराठी तितुका मेळवावा’ मुंबईत मराठीचा डंका; वरळीत रंगणार विश्व मराठी संमेलन

विश्व मराठी संमेलनात विदर्भाला डावलले; थेट शिंदे-फडणवीस यांच्याकडे तक्रार!

गुजराती वरवंटा : महाराष्ट्रातील दोन लोकप्रतिनिधींचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार, निमंत्रण पत्रिका मात्र गुजरातीमध्ये !

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत ४,५ आणि ६ जानेवारी रोजी वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअममध्ये हा संमेलन सोहळा रंगणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी वस्त्रालंकारांचा फॅशन शो, जगातील नामवंत उद्योजकांच्या मुलाखती, लावणी, लोककला, विविध विषयांवर परिसंवाद यांसारखे रंगारंग कार्क्रम होणार आहेत.

वैश्विक मराठी संमेलनात राज्यभाषेला दुय्यम स्थान


मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या वैश्विक संमेलनात मराठीलाच दुय्यम स्थान देण्यात आल्याचे समोर आले आहे. या संमेलनात सहभागी होण्यास इच्छूक असलेल्या मराठी रसिकांसाठी संकेतस्थळावर एक लिंक देण्यात आली आहे. त्यावर संबंधितांना आपले नाव, ई-मेल आयडी आणि अन्य तपशील नमूद करावा लागत आहे. मात्र, हा सर्व तपशील इंग्रजी भाषेत भरावा लागत आहे. आधीच या संमेलनात वैदर्भीयांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक वाद निर्माण होऊ शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी