गेल्या काही महिन्यांपासून लांबलचक दाढीत वावरत असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा नवा फ्रेश लूक समोर आला आहे. राहुल गांधी सात दिवसांच्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्याचप्रमाणे ते केंब्रिज विद्यापीठ येथे अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान देणार आहेत. यामुळे देश तसा वेश या म्हणीचा अवलंब करीत त्यांनी स्वत:मध्ये बदल केला आहे. भारत जोडो यात्रेनंतर आता लंडन दौऱ्यावर असताना ट्रिम दाढी आणि अंगात कोट व टाय घातलेल्या राहुल यांच्या नव्या लुकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहेत. (Rahul Gandhi appeared in a new After reaching London)
विशेषतः जवळपास तीन महिने चालेलल्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात बरेच बदल झालेले अनुभवायला मिळाले. त्यापैकी एक बाह्य बदल म्हणजे त्यांचा लूक. संपूर्ण यात्रेत राहुल गांधी हे वाढलेल्या दाढीत व पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत होते. याबद्दल पत्रकारांनी अनेकदा त्यांना विचारणाही केली होती. मात्र, राहुल यांनी त्यावर मौन बाळगलं होतं. दरम्यान यात्रा संपल्यानंतरही संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ते त्याच लूकमध्ये दिसले. त्यानंतर आता अचानक त्यांचा दाढी ट्रिम केलेला फोटो समोर आला आणि समजमध्यमांवर व्हायरल होत आहे.

राहुल गांधी हे केंब्रिज विद्यापीठात ‘लर्निंग टू लिसन इन द २१ सेंचुरी’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ते अनिवासी भारतीयांशी संवाद साधणार आहेत. याबाबत विद्यापीठाच्या अधिकृत ट्विटर हॅंडल केंब्रिज जजने ट्विट करत माहिती दिली आहे.
Our @CambridgeMBA programme is pleased to welcome #India‘s leading Opposition leader and MP @RahulGandhi of the Indian National Congress.
He will speak today as a visiting fellow of @CambridgeJBS on the topic of “Learning to Listen in the 21st Century”. pic.twitter.com/4sTysYlYbC
— Cambridge Judge (@CambridgeJBS) February 28, 2023
भारत जोडो यात्रेत कडाक्याच्या थंडीतही राहल गांधी केवळ एका टी-शर्टवर होते. त्याबाबत विचारलं असता, देशातील अनेकांना थंडीतही कपडे मिळत नाहीत. ते कुठल्या परिस्थितीत राहतात हे मला समजून घ्यायचं आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. केवळ काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत असताना राहुल यांनी कोट परिधान केला होता. त्यानंतर त्यांनी बहीण प्रियांकासोबत गुलमर्गमध्ये स्कीइंगचा आनंद लुटला. आता ते सात दिवसांच्या दौऱ्यावर ब्रिटनला पोहोचले आहेत.
हे सुद्धा वाचा :
राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; वाचा काय आहे प्रकरण
अदानीवरून राहुल गांधींचे पंतप्रधानांना 7 प्रश्न; मोदी सरकारची कोंडी!