29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भभांडकुदळ राणांचा पोलिसांसोबत राडा

भांडकुदळ राणांचा पोलिसांसोबत राडा

अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाणे परिसरात राहणारी 19 वर्षांची मुलगी रात्री बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या वडीलांनी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली. पोलीस तिचा शोध घेत आहेत. परंतु ती सापडली नाही. त्यामुळे नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशन गाठले.

अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाणे परिसरात राहणारी 19 वर्षांची मुलगी रात्री बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या वडीलांनी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली. पोलीस तिचा शोध घेत आहेत. परंतु ती सापडली नाही. त्यामुळे नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशन गाठले. राजपेठ पोलिसांनी तरुणीचा शोध‍ घेण्याचे प्रयत्न केले. एका संशय‍ित तरुणाला पोलिसांनी पकडून आणले होते. मात्र त्याच्याकडून त्या तरुणीचा कोणताही सुगावा लागला नाही. त्यामुळे नवीन राणांनी पोलिसांबरोबर हुज्जत घातली. त्याच वेळी पोलिसांनी त्यांचा कॉल रेकॉड केला.त्यामुळे नवनीत राणा प्रचंड संतापल्या.

मी दल‍ित आहे म्हणून माझा कॉल रेकॉर्ड करताय असा अरोप त्यांनी यावेळी केला. पोलीस उपायुक्त विक्रम साळवी यांच्याशी त्यांनी हुज्जत घातली.गेल्या अनेक दिवसांपासून नवनीत राणा या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्या सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. हनुमान चालिसाचा मुद्या त्यांनी उचलून धरला होता. दोन दिवसांपुर्वी देखील त्यांनी उद्धव करेंवर टीका केली होती. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला होता. संधी मिळेल तिथे त्या उडी मारतात आणि वाद ओढवून घेतात. त्यामुळे त्या अलिकडे प्रस‍िद्धीच्या झोतात आल्या आहेत.

कोण आहेत नवनीत राणा :

नवनीत कौर राणा यांचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला. ‍ त्यांचे वडील सैन्यात अध‍िकारी होते. 12 वी नंतर नवनीत यांनी मॉडेलिंग सुरु केले. 2011 मध्ये एका सामुहिक विवाह सोहळयामध्ये साडेतीन हजार जोडप्यांसोबत लग्न केले. अमरावतीचा हा सामुदायिक विवाह सोहळा रामदेव बाबांच्या संस्थेने आयोजित केला होता. या सोहळयाला अनेक मोठया नेते मंडळीनी, अभ‍िनेत्यांनी हजेरी लावली होती.

हे सुद्या वाचा

Manikrao Thackeray : ‘ते’ असा विचार करुच शकत नाही – माणिकराव ठाकरे

Income tax : महाराष्ट्रातील बलदंड ठेकेदारावर इन्कम टॅक्सची धाड

political party : 138 कोटी लोकसंख्येच्या देशात सुमारे 2044 राजकीय पक्ष

नवनीत राणांनी अनेक कन्नड, पंजाबी, त्यानी 2003 पासून अभ‍िनयात पदार्पण केले. नवनीत राणां बरोबर लग्न झाल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. नवनीत राणा यांनी 2014 मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिक‍िटावर अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना अनंदराव अडसुळ यांच्या कडून पराभव पत्कारावा लागला होता. तर 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा अपक्ष उभ्या राहिल्या आणि न‍िवडून आल्या. अमरावतीतून खासदार होणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार आहेत. आता त्यांचे राजकारण हे भाजप धार्जिणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी