28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeजागतिकRishi Sunak ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान!

Rishi Sunak ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान!

मुळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. कंजर्वेटिव पक्षाने ऋषी सुनक यांना आपला नेता निवडले आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुनक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

मुळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. कंजर्वेटिव पक्षाने ऋषी सुनक यांना आपला नेता निवडले आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुनक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक आणि पेनी पेनी मॉरडॉन्ट यांचे नाव होते. जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर पेनी मॉरडॉन्ट या पंतप्रधानपदासाठी आवश्यक तेवढे समर्थन मिळवू शकल्या नाहीत. त्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर ऋषी सुनक यांच्या नावावर ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून शिक्कामोर्तब झाले. ऋषी सुनक यांनी पक्षांतर्गत देखील मोठा पाठींबा मिळाला.

हे सुद्धा वाचा

CM Eknath Shinde : सर्वसामान्यांना मुख्यमंत्र्यांचे दिवाळी गिफ्ट; नवी मुंबईत सिडकोची 7849 घरांची सोडत

Prithviraj Chavan : भाजप-शिंदे सरकारचा राज्याला फायदा नाही; माजी मुख्यमंत्र्यांची टीका

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही वेळी फटाके वाजणार? शिंदे गटाचे आमदार नाराज?

ऋषी सुनक यांना कंजर्वेटिव पक्षाच्या खासदारांचा पाठींबा मिळत आलेला आहे. आणि अर्थखात्याची त्यांना चांगली जाण आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत याआधी त्यांनी लिझ ट्रस यांना चांगली टक्कर दिली होती. ब्रिटनमध्ये महागाईचा प्रश्न मुख्य मुद्दा बनला आहे. त्यामुळे आता ऋषी सुनक ही समस्या कशा पद्धतीने हाताळतात याकडे तेथील नागरिकांचे लक्ष आहे.
ऋषी सुनक यांनी करोना संसर्गाच्या काळात ब्रिटनमध्ये चागंलं काम केले होते. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनच्या जनतेमध्ये ऋषी सुनक यांची लोकप्रियता वाढली होती. ऋषी सुनक यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. या कार्यकाळात सुनक यांना देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान असणार आहे.

कोण आहेत ऋषी सुनक
ऋषी सुनक यांचा जन्म यूकेच्या साउथॅम्प्टन भागात एका भारतीय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा पंजाबचे आहेत. सुनक हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्डचे पदवीधर आहेत आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना अनुष्का आणि कृष्णा या दोन मुली आहेत. रिचमंड, यॉर्कशायर येथून निवडून आल्यानंतर ऋषी सुनक 2015 मध्ये संसद सदस्य बनले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी