29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeजागतिकजगाने अणू बॉम्बचा कहर पहिला; विनाशकारी दुसऱ्या महायुद्धाचा अस्त झाला!

जगाने अणू बॉम्बचा कहर पहिला; विनाशकारी दुसऱ्या महायुद्धाचा अस्त झाला!

युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे या दोन परस्पर विरोधी गटात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाला आज 84 वर्षांपूर्वी सुरुवात झाली. 1 सप्टेंबरला 1939 पासून दुसरे महायुद्ध अधिकृतरित्या सुरु झाले. जर्मनीने पोलंडवर हल्ला केल्याने 1 सप्टेंबरला 1939 पासून दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. मानवी युद्धतील सर्वात मोठी जीवितहानी दुसऱ्या महायुद्धात झाल्याने जगभरातं तिसऱ्या महायुद्धाविरोधात कडक पाऊले उचलली गेली. जगाची अर्थव्यवस्था बदलली आणि जागतिक पातळीवर आपापसातले हेवेदावे विसरण्यासाठी शांतता करार, संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली. जगाने अणू बॉम्बचा कहर पहिल्यानंतर विनाशकारी दुसऱ्या महायुद्धाचा अस्त झाला!

दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी –
११ नोव्हेंबर १९१८ रोजी पहिले महायुद्ध संपले. त्यानंतर जर्मनीने पोलंडवर हल्ला केल्यानंतर इतर राष्ष्ट्रानी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला. जर्मनीच्या बाजूने जपान आणि इटलीने सहभाग घेतला. त्यांच्याविरोधात फ्रान्स, युनायटेड किंग्डम राष्ट्रे उभी राहिली. मात्र युद्धाची खरी ठिणगी जपानमुळे पडली. 1941 साली जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केले. या घटनेचा विरोध करत अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला. दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रे आणि अक्ष राष्ट्रे या दोन गटात झाले. चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका अशी बलाढ्य राष्ट्रे दोस्त राष्ट्राच्या गटात होती. तर दुसरीकडे जर्मनी, इटली व जपान हे देश अक्ष राष्ट्रांमध्ये मोडले गेले. या युद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती –
अमेरिकेने पर्ल हार्बर बंदरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर तीन दिवसांच्या अंतराने अणूहल्ला केला. 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील हिरोशिमा शहरात अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला. 9 ऑगस्टला नागसाकी शहरात अणुबॉम्ब टाकला गेला. या हलल्यानंतर जपानने 14 ऑगस्टला शरणागती पत्करली व दुसरे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त झाले. जग विनाशाच्या वाटेवरून थोडक्यात बचावले.

हे ही वाचा 

मेगाभरती! सरकारी नोकरी मिळवण्याची तरुणांना संधी!

आत्ता ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’? मोदींची नवी खेळी

मोदींच्या निकटवर्तीय मंत्र्याच्या घरात आढळला मृतदेह! मंत्री महोदय फसणार?

दुसऱ्या महायुद्धाचे दुष्परिणाम –
जवळ जवळ ७० देशांचे सैन्य दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाले होते. जर्मनी, पोलंड, रशिया आणि जपानमध्ये सर्वाधिक लोक बळी पडले. दुसऱ्या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली. या रक्तरंजित इतिहासानंतर कोणत्याही परिस्थितीत तिसरे महायुद्ध घडू द्यायचे नाही अन्यथा जगाचा विनाश पक्का असल्याने अमेरिका तसेच इतर राष्ट्रे युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास संबंधित राष्ट्रामध्ये तणावपूर्ण परिस्थिती टाळण्याचे प्रयत्न करत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी