28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeजागतिकचीनमध्ये तिसऱ्यांदा हुकूमशहा जिनपिंगची सत्ता!

चीनमध्ये तिसऱ्यांदा हुकूमशहा जिनपिंगची सत्ता!

चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हुकुमशाहीविरोधात लाट असल्याचे सांगितले जात होते. ज्या चीनी नागरिकांनी याविरोधात आवाज उठवला त्या व्यक्तीचे जगणे मुश्किल करणाऱ्या या निरपेक्ष शासकाबद्दल संपूर्ण जगाला कल्पना आहे. मात्र तरीही सर्वसंमतीने तिसऱ्यांदा त्यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. कोरोना काळातील कठोर निर्बंध आणि हुकुमशाही सारखा कारभार यामुळे कम्युनिस्ट पक्षातही त्यांच्याविरोधात अस्वस्थता होती. असे असतानाही जिनपिंग यांना सर्वानुमते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बनविण्यात आले आहे. जिनपिंग यांच्या विरोधात पक्षातून दुसरा उमेदवार उभा राहिला नाही. यामुळे त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. (Dictator Xi Jinping’s power in China for the third time!)

माओत्से तुंग यांच्यानंतरचे सर्वात शक्तीशाली नेते म्हणून जिनपिंग यांनी चीनवर पकड मजबूत केली आहे. चीनच्या रबर-स्टॅम्प संसदेच्या जवळपास 3,000 सदस्यांनी, नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) ने एकमताने जिनपिंग यांना मतदान केले. 69 वर्षीय शी यांच्यासाठी ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे मतदान पार पडले. समोर कोणी प्रतिस्पर्धी नसला तरी हे मतदान घेण्यात आले. हे मतदान जवळपास १ तास सुरु होते. तर मोजणी १५ मिनिटांत पूर्ण झाली.

संसदेचे अध्यक्ष म्हणून झाओ लेजी आणि उपाध्यक्ष म्हणून हान झेंग यांची निवड करण्यात आली. जिनपिंग यांनी २०१८ मध्येच राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळाची मर्यादा संपुष्टात आणली होती. गेल्या ऑक्टोबरमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीसपदी आणखी पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. याचबरोबर शी जिनपिंग यांना केंद्रीय सैन्य आयोगाचे तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून देखील निवडण्यात आले आहे.

चीनमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर जगभरातून प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. भारतासोबत अमेरिका आणि युरोप चीनच्या सीमाप्रश्न आणि राजकीय कुरघोडींवर लक्ष ठेवून आहेत. चीनमध्ये तिसऱ्यांदा हुकूमशहा जिनपिंगची सत्ता आल्याच्या वृत्तानंतर मात्र सोशल मीडियावर मीम्सने धुमाकूळ घातला आहे.

हे सुद्धा वाचा:

चीनचं पहिलं-वाहिलं मंगळ मिशन असफल!

यंदा भारत होणार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश; गेल्या 60 वर्षात प्रथमच घटली चीनची लोकसंख्या!

VIDEO : चीनमधील कोरोना व्हेरिएंटचे तीन रुग्ण मुंबईत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी