29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रतरूण तुर्क आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट

तरूण तुर्क आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट

टीम लय भारी

विधिमंडळच्या अधिवेशनादरम्यान राज्यातील तरुण आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातूनही या तरुण आमदारांना पुरेसा वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं. आमदार आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार ऋतुराज पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार धिरज देशमुख, आमदार योगेश रामदास कदम, आमदार अतुल बेनके, इंद्रनील नाईक यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

आमदार धिरज देशमुख यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की शरद पवार यांच्या सोबतची भेट आणि त्यांच्याशी झालेला संवाद हा नेहमीच नवी प्रेरणा व नवी स्फूर्ती देणारा असतो. तीच अनुभूती आजही आली. आदरणीय शरद पवार यांनी तरुण आमदारांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आम्ही मतदारसंघात करीत असलेल्या कामांचीही त्यांनी आवर्जून माहिती घेतली आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यांनी केलेले कौतुक एक वेगळेच समाधान देणारे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी