35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाडांनी घेतली बैठक : तळीये मध्ये 261 घरे उभी राहणार

जितेंद्र आव्हाडांनी घेतली बैठक : तळीये मध्ये 261 घरे उभी राहणार

टीम लय भारी

मुंबई: तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी म्हाडा तळीये गाव नव्याने वसवणार, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याच संदर्भात मंत्रालयात बुधवारी (ता.18) जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोकण पुरात उध्वस्त झालेल्या तळीये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्वसन होणार आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad said 261 houses will be erected in Taliye).

 

तळीये गावातील 63 आणि आजूबाजूच्या पाड्यातील 198 असे सर्व मिळून एकूण 261 घरांची निर्मिती म्हाडा करणार आहे. तसेच या घरांची प्रतिकृती डिझाईन आम्ही दोन दिवसात जाहीर करणार आहोत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad said that we will announce the replica design of the houses in two days).

जितेंद्र आव्हाडांनी दिली खुषखबर, सर्वसामान्यांसाठी 8,205 घरांची सोडत

डॉ. जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, तळीये गाव वसविण्याचे काम ‘म्हाडा’ करणार

Jitendra Awhad said 261 houses will be erected in Taliye
डॉ.जितेंद्र आव्हाड

तळीये गावच्या पुनर्वसन करण्यासाठी लागणारी जागा, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी निर्धारित केली आहे. तसेच स्थानिक रहिवाशांना देखील सदर जागा पसंत आहे. गावच्या पुनर्वसनासाठी लागणारी जागा एकूण 30 एकर असून या जागेत एक आदर्श गाव वसवण्याचा संकल्प आह. पुनर्वसन करण्यात येणाऱ्या तळीये गावात घरांच्या निर्मिती सोबतच बालवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय सारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती देखील म्हाडा करणार आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे (Jitendra Awhad said the total land required for rehabilitation of the village is 30 acres).

जितेंद्र आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा

Thane: Jitendra Awhad urges TMC chief to conduct audit for illegal buildings

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे तळीये मध्ये “रेन वॉटर हार्वस्टिंग आणि सोलर पॅनेल” च्या सुविधेसह युक्त असणार आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवार यांनी सांगितल्या प्रमाणे तळीये गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी मी घेतली आहे, आणि ती नक्कीच मोठ्या ताकदीने मी पूर्ण करेल, हा माझा विश्वास आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

यावेळी या बैठकीत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते (Jitendra Awhad and other officers were present).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी