33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeटॉप न्यूजउद्धव ठकरे यांनी आदिती तटकरे यांचे केले कौतुक

उद्धव ठकरे यांनी आदिती तटकरे यांचे केले कौतुक

टीम लय भारी

अलिबाग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उसर(ता.अलिबाग) येथील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती(Uddhav Thackeray praised Aditi Tatkare in alibaug).

छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे भूमिपुजन झाले. शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयी सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय उभे करत आहोत, अशी मुख्यमंत्र्यांनी केली.

या इमारतीच्या भूमिपूजना वेळी मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात काही महत्त्वाचे मुद्दे सभेत मांडले. या भाषणात
गेल्या दोन वर्षात रुग्णालयांचे नुतनीकरण, नवीन हॉस्पीटलचे उदघाटन, श्रेणीवर्धनाचे जास्तीत जास्त काम महाराष्ट्रात झाले. या कामाबद्दलचा थोडक्यात आराखडा मांडला.

मुख्यमंत्री म्हणाले, मागण्या अनेक असतात मात्र नुसत्या मागण्या करून काही होत नाही त्याच्या पुर्णत्वासाठी पाठपुरावा करावा लागतो. तरीही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी याचा खुप पाठपुरावा केला. म्हणूनच या पाठपुराव्याला यश मिळाले आहे, असे बोलत त्यांनी अदिती तटकरे यांचे कौतुक केले.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांची संकल्पना, शिवाजी पार्कमध्ये भरणार भव्य ऐतिहासिक प्रदर्शन!

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळवून देण्यासाठी मंत्री सुभाष देसाईंची राष्ट्रपतींकडे मागणी

राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार देवेंद्र भुजबळ यांना जाहीर

Maharashtra: Need to ramp up COVID-19 vaccination, necessary to wear mask, says CM Uddhav Thackeray

मुंबई- पुण्याच्या सीमा लाभलेल्या या जिल्ह्याला चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सोबत उद्योग व्यवसायाचा विकास करतांना निरोगी आरोग्याकडे लक्ष देणे हे देखील गरजेचे आहे. लसीकरण वाढवा, काळजी असे सांगत लोकांना त्यांनी संबोधले आहे. अपघातग्रस्त भागात ट्रॉमा केअर सेंटर उभे करत आहोत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी,खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे.आमदार जयंत पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी,वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.दिपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र कुरा आदी राजकीय मान्यवर सभेत उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी