24 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeजागतिकमोठी बातमी : अमेरिकेवर सायबर हल्ला, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण हवाई सेवा...

मोठी बातमी : अमेरिकेवर सायबर हल्ला, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण हवाई सेवा ठप्प!

व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी बोलावली तातडीची बैठक, सायबर हल्ला नसल्याचा सरकारचा दावा; संगणक प्रणालीतील बिघाडामुळे उड्डाणे रद्द केल्याची सिव्हिल एव्हिएशनच्या वेबसाइटवर पुष्टी

याक्षणीची जगातील सर्वात मोठी बातमी म्हणजे, अमेरिकेवर सायबर हल्ला झाल्याची भीती व्यक्त होत आहे. (America Cyber Attack US Flight Operations Stopped) अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण हवाई सेवा ठप्प झाली आहे. व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. हा सायबर हल्ला नसल्याचा दावा अमेरिकी सरकारने केला आहे. दुसरीकडे, संगणक प्रणालीतील बिघाडामुळे उड्डाणे रद्द केल्याची सिव्हिल एव्हिएशनच्या वेबसाइटवर पुष्टी करण्यात आली आहे.

याक्षणी अमेरिकेतील सर्व विमानांची उड्डाणे रद्द करून त्यांना आहे त्या ठिकाणी ग्राउंडेड म्हणजे लॅंडींग केले गेले आहे. अमेरिकेच्या इतिहासातील संगणक प्रणालीमधली ही सर्वात मोठी गडबड असल्याचे सांगितले जात आहे. व्हाईट हाऊसमध्ये बैठकीनंतर बिडेन यांनी याबाबत अहवाल मागितला आहे. नोटिस टू एअर मिशन (NOTAM) प्रणालीतील त्रुटीमुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगितले जात आहे. नोटाम ही एक सांकेतिक कोड भाषा असते. टेकऑफपूर्वी अंतिम ब्रीफिंग दरम्यान पायलट आणि क्रू मेंबर्सना नोटामद्वारे उड्डाण मार्गावरील ताज्या स्थितीची माहिती दिली जाते. समजा, एखाद्या भागात काही लष्करी सराव, एअर शो, पॅराशूट जंपिंग, ग्लायडिंग इव्हेंट किंवा एअरफील्डजवळ अन्य काही समस्या असल्यास या हवाई मार्गातील अडथळ्यांबाबत माहिती वैमानिक आणि चालक दलाला नोटामद्वारे दिली जाते. याशिवाय, धावपट्टी किंवा टॅक्सी-वे बंद असेल अथवा रेडिओ नेव्हिगेशन सिस्टीममध्ये सिग्नलमध्ये काही समस्या असतील, तर तेही या सांकेतिक कोड भाषेतून संबंधित यंत्रणांना शेयर केले जाते.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या (FAA) संगणक प्रणालीतील गडबड असल्याने अमेरिकेतील तीन हजारांहून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. किंवा लांबणीवर टाकली गेली आहेत. सिव्हिल एव्हिएशनच्या वेबसाइटवर याची पुष्टी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या इतिहासात एव्हढा मोठा तांत्रिक बिघाड व त्यामुळे विमानसेवा ठप्प होण्याची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या अभूतपूर्व अनागोंदीच्या स्थितीनंतर, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी राष्ट्रीय परिवहन सचिवांना तातडीने व्हाईट हाऊसमध्ये बोलावून घेतले आहे. परिवहन सचिवांनी राष्ट्राध्यक्षांना या समस्येची माहिती दिल्याचे प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन पियरे यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या एवढ्या मोठ्या तांत्रिक बिघाडानंतर व्हाईट हाऊसचेही स्पष्टीकरण आले आहे. “आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे हे सायबर हल्ल्याचे प्रकरण नाही, असे आपण म्हणू शकतो; परंतु राष्ट्राध्यक्षांनी या प्रकरणाची सखोल आणि गंभीर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,” असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

अमेरिकेतील विमान उड्डाण सेवा ठप्प झाल्याने प्रवासी खोळंबले आहेत. नेमकी माहिती मिळत नसल्याने सोशल मीडियावर त्यांच्या भावनांचा उद्रेक होत आहे.
अमेरिकेतील विमान उड्डाण सेवा ठप्प झाल्याने प्रवासी खोळंबले आहेत. नेमकी माहिती मिळत नसल्याने सोशल मीडियावर त्यांच्या भावनांचा उद्रेक होत आहे.

हे सुद्धा वाचा : 

अमेरिकेचा माज निसर्ग उतरवतोय; हिमवादळापुढे सपशेल शरणागती; शतकातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती !

न्यू यॉर्कमध्ये आणीबाणी : बॉम्बने केले अमेरिकेतील जनजीवन ठप्प; तापमान उतरले -45 अंश सेल्सिअसवर!

मोबाईल चार्जर देखील करु शकतो तुमचे बँक खाते रिकामे

तांत्रिक बिघाड किती काळ सुरू राहील किंवा स्थिती पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागतो, यावर यापुढील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे अवलंबून आहे. अमेरिकेतून उड्डाण घेणाऱ्या व लॅंडींग करणाऱ्या विमान सेवांवरही या संगणकीय बिघाडाचा परिणाम होत आहे. ही सर्व उड्डाणे रद्द किंवा विलंबित होतील, अशीच स्थिती सध्या आहे. हा बिघाड लवकर सुधारला नाही, तर अमेरिकेला सुमारे 20 दक्षलक्ष डॉलरचे नुकसान होऊ शकते. फेडरल एव्हिएशन एजन्सीने नोटिस टू एअर मिशन यंत्रणा नेमकी कधी ठीक होईल हे सांगता येत नाही, असे म्हटले आहे. तांत्रिक कर्मचारी यंत्रणा दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत. फ्लाइट ऑपरेशन लवकरच पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिकेत अचानक उद्भवलेल्या यंत्रणेतील बिघाडाचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे. सोशल मीडियावर प्रवाशांचा संताप उसळताना दिसत आहे.

गेल्यावर्षी रशियन हॅकर्सनी अमेरिकेच्या यंत्रणेवर सायबर हल्ला केला होता. 

America Cyber Attack, US Flight Operations Stopped, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण हवाई सेवा ठप्प, NOTAM Computer System Code Problem

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी