28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeजागतिक‘या‘ देशातील प्रत्येक घरात असते बंदूक

‘या‘ देशातील प्रत्येक घरात असते बंदूक

टीम लय भारी

न्युयाॅर्कः अमेरिकेतल्या प्रत्येक घरात बंदूक असते. त्यामुळे अनेक वेळा गोळीबारीच्या घटना घडतात. गेल्या रविवारी अमेरिकेमध्ये फ्रीडम परेड पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी एका व्यक्तीने दुकानाच्या छतावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला असून, 31 जण जखमी झाले आहेत.

अमेरिकेत 1791 मध्ये नागरिकांना हत्यार वापरण्याचा कायदा आमलात आला. तो कायदा आजही सुरु आहे. भाजी खरेदी करण्याइतके अमेरिकेत हत्यार खरेदी करणे सोपे आहे. अमेरिकेतील शेकडो दुकानात बंदूका विकल्या जातात. अमेरिकेमध्ये दर रविवारी बंदूकांचे प्रदर्शन लागतात.बंदूक खरेदी करतांना एक फाॅर्म भरायचा असतो. त्यावर नाव, पत्ता, जन्मतिथी आणि नागरिकतेची नोंद केल्यानंतर खरेदी करता येऊ शकते. अमेरिकेमध्ये ‘द गन कंटोल अॅक्ट‘ नुसार 18 वर्षांवरील नागरिक बंदूक, रायफल चालवू शकतात. अमेरिकेत दारुडे, मनोरुग्ण, आजारी व्यक्ती तसेच 1 वर्षांहून अधिक काळ जेलमध्ये जावून आलेली व्यक्ती बंदूक खरेदी करु शकत नाही.

स्विझर्लंडमधील एका सर्वेनुसार जगातील सुमारे एक तृतीयांश वृध्दांजवळ बंदूका आहेत. अमेरिकेतील केवळ दोन देशांमध्ये बंदूकीचा वापर कमी केला जातो. ग्वाटेमाला, मॅक्सिकोमधील कमी लोकांकडे बंदूका आहेत. या देशांमध्ये केवळ एक बंदूकीचे दुकान आहे. ज्यावर आर्मीचे नियंत्रण आहे. मागच्या 50 वर्षांमध्ये 15 लाख लोकांचा मृत्यू गोळीबारीमुळे झाला आहे. अमेरिकेमधील गन कल्चरमुळे हत्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच आत्महत्येची संख्या देखील वाढली आहे. 2019 मध्ये अमेरिकेत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेल्यांची संख्या 23 हजारहून अधिक आहे.

अमेरिकेमधील गन कल्चर न संपण्यासाठी तिथेल राज्यकर्ते कारणीभूत आहेत. हा कायदा बंद करण्यासाठी मागणी करणारा देखील एक वर्ग आहे. मात्र त्यांना राज्यकत्र्यांनी नेहमीच विरोध केला आहे. थियोडेर रुज्वेल्ट, फ्रैंकलिन डी रुजवेल्ट, जिमी कार्टर, जाॅर्ज बुश सीनियर, जाॅर्ज डब्ल्यू बुश, डोनाल्ड ट्रम्प यांनी गन कल्चरचे समर्थ केले आहे. अमेरिकेत 63 हजार नेत्यांकडे बंदूका होत्या. त्यावेळी 83 हजार करोड रुपयांच्या बंदूका विकल्या गेल्या. नॅशनल रायफल असोसिएशनने अमेरिकेमध्ये सर्वांत ताकदवान गन लाॅंबी असल्याचे सांगितले.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : नाना पटोले दिंडीत झाले सहभागी !

विधानसभेत शब्दांचा वार, राजभवनात पुष्पगुच्छ भेट

कोल्हापूरकरांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी