31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeशिक्षणमहाविद्यालय व विद्यापीठ अध्यापकांना आता संवर्गनिहाय आरक्षण मिळणार

महाविद्यालय व विद्यापीठ अध्यापकांना आता संवर्गनिहाय आरक्षण मिळणार

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील शैक्षणिक संस्थामधील वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर अध्यापकीय पदांना विषयनिहाय आरक्षण लावण्याचे धोरण अस्तित्वात आहे. मात्र, विषयनिहाय आरक्षणामध्ये मागासवर्गीयांना अध्यापकीय पदांमध्ये त्यांच्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याचे समोर आले होते. यावर मागासवर्गीय संघटनांनी शिक्षकीय पदांना विषयनिहाय ऐवजी संवर्गनिहाय आरक्षण धोरण लागू करण्याची मागणी लावून धरली होती(University teachers will get category wise reservation).

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शैक्षणिक संस्थातील महाविद्यालय, विद्यापीठांत आता शिक्षकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू होणार आहे. याबाबतचे विधेयक मंगळवारी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मांडले. यानंतर सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेनंतर विधान परिषदेतही या विधेयकला मंजुरी देण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅपवर वर्तमानपत्रे शेअर करणाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका; ग्रुप बंद करण्याचे दिले आदेश!

मलबार हिल ट्रीटॉप वॉकवेच्या बांधकामासाठी BMC देणार 22 कोटींचे कंत्राट

केंद्र शासनाने ९ जुलै २०२१ च्या अधिनियमान्वये केंद्रीय शैक्षणिक संस्थांमधील अध्यापकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण धोरण लागू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याची मागणी होत होती.

विषयनिहाय आरक्षणामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर खरोखरच अन्याय होतो का हे तपासण्यासाठी केंद्र शासनाने एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. त्यात विषयनिहाय आरक्षणामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होतो हे स्पष्ट केले होते. तसेच हा अन्याय दूर करण्यासाठी शिक्षकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याची शिफारस केली होती.

लवकरच, प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमध्ये चित्रपट, संगीताचा आनंद मोफत घेता येणार

FPJ-Ed: On Mumbai University Convocation day, Ph.D. holders talk about leaving COVID-19 behind and looking to the future

या मागणीची दखल घेत केंद्र शासनाचे अध्यापकीय संवर्गाचे आरक्षण धोरण राज्यातील अध्यापकीय संवर्गांना लागू करण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (अध्यापकीय संवर्गाचे आरक्षण) विधेयक, २०२१ हे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी विधानसभेत मांडले. त्याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. विधानसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर विधान परिषदेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी हे विधेयक मांडले त्याला परिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी