टीम लय भारी
मुंबई: अभिनेते सयाजी शिंदे हे हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटात मोठ नाव होय. अभिनेते सयाजी शिंदे कलाकरा असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात वृक्षतोड होणार असल्याचे समजताच सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. Sayaji shinde opposed cut down 158 trees
त्यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. “ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत”.
ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत. pic.twitter.com/CoJtCD77cI
— sayaji shinde (@SayajiShinde) May 5, 2022
सायन रुग्णालयात तब्बल १५८ झाडे तोडण्यात येणार आहेत. रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी ही झाडे तोडली जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा:
‘आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, पण भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल’