टीम लय भारी
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या कृपेने मंत्री झालेले संदिपान भुमरे आता शिंदे गटात सामील झाले आहेत. भुमरे यांनी गद्दारी केल्यानंतरही ठाकरे सरकारने त्यांना मोठे गिफ्ट दिले आहे.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खात्याने भुमरे यांना हे गिफ्ट दिले आहे. म्हाडाच्या वतीने नुकतीच घरांची सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये भुमरे यांना घर मिळाले आहे.
शिवसेनेचे #बंडखोर आमदार तथा कॅबिनेट #मंत्री संदीपानजी #भुमरे यांचे अभिनंदन!
भुमरे हे #मविआ'चे सरकार पाडण्यासाठी शिंदेंसोबत #गुवाहाटीत जाऊन बसलेत, पण त्यांना आज निघालेल्या #म्हाडा'च्या लॉटरीत नवंकोरं घरं आमदाराच्या कोट्यातून मिळालय.
( ३/१) pic.twitter.com/KN4V39CksW— Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) June 24, 2022
आमदार या संवर्गातून भुमरे यांना हे घर मिळाले आहे. खरेतर, मंत्र्यांकडे बंगले, गाडी, नोकर – चाकर असतात. असे असतानाही भुमरे यांनी घरासाठी अर्ज केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विशेष म्हणजे, ज्या सरकारच्या विरोधात त्यांनी कटकारस्थान रचले त्याच सरकारने त्यांना हे घर दिले आहे. त्यामुळे स्वाभिमान जागृत ठेवून ते मिळालेले घर परत करणार की,लॉटरी लागलेले घर कोडगेपणाने पदरात पाडून घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हे सुद्धा वाचा : फुटीर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात शिवसैनिकांचे आंदोलन !
आसामची इज्जत जात आहे, इथून लवकर चालते व्हा; एकनाथ शिंदेंना स्थानिकांचे पत्र