30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंच्या घराचा परिसर झाला ‘चकाचक

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंच्या घराचा परिसर झाला ‘चकाचक


टीम लय भारी

ठाणेः बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात लुईसवाडी येथे घर आहे. या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. महाविकास आघाडी सरकामध्ये एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते, असे असतांना देखील त्यांचे स्वतःच्या परिसरात लक्ष नव्हते का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

आता मात्र हा परिसर चकाचक झाला आहे. लुईस वाडीमध्ये दोन दिवसांपूर्वी फुटपाथ तुटलेल्या अवस्थेमध्ये होते. अजूबाजूला घाण होती. जवळच सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे सगळीकडे पसारा पडला होता. रस्ता बंद होता. 1 जूनपासून हा परिसर अत्यंत चकाचक झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्र्चयाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय शिंदेच्या घराच्या परिसरात सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ठाण्याचा आणखी विकास होणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री पदाची सूत्रे त्यांच्या हातात असली तरी पदाचा वापर करण्यासाठीची ‘लगाम‘ फडणवीसांच्या हातात आहे. महाराष्ट्रावर केंद्राच्या सीसीटिव्हीची नजर आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे भवितव्य दिल्लीश्वरांच्या हातात आहे, असे म्हटले तर ती अतिशोक्ती होणार नाही हे मात्र खरे!

हे सुध्दा वाचाः

नवीन मुख्यमंत्र्यांना माजी आमदाराचे पत्र, फडणवीस यांच्यापासून सावध राहण्याचा दिला सल्ला

एकनाथ शिंदेंना लोकांचे शिव्याशाप सोसवेना, फेसबुक पेजवरील कॉमेंट बॉक्स केला बंद

लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, शंकरराव गडाख यांना पुन्हा ‘जीव मुठीत घेऊन’ पवित्र सभागृहात यावे लागणार…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी