28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रद्रौपदी मुर्मूंची देशाच्या राष्ट्रपती पदी झालेली निवड हा ‘समस्त‘ स्त्रीशक्तीचा गौरव -...

द्रौपदी मुर्मूंची देशाच्या राष्ट्रपती पदी झालेली निवड हा ‘समस्त‘ स्त्रीशक्तीचा गौरव – अजित पवार

टीम लय भारी

पुणेः राष्ट्रवादी काॅंग्रेचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्रौपदी मुर्मूंना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची झालेली निवड हा भारतीय संविधानातील मुलतत्वांचा, देशातील समस्त स्त्रीशक्तीचा गौरव आहे. आजच्याच दिवशी देशाला प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती लाभल्या होत्या. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आज होत आहे. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने भारतीय स्त्रीशक्तींची जगाला नव्याने ओळख होईल.

देशात स्त्रीपुरुष समानतेच्या चळवळीला बळ मिळेल. महिलांना त्यांचा हक्क, समाजात मान, सन्मान, आदर मिळवून देण्यात, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यात श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची झालेली निवड महत्वाची भूमीका बजावेल. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेकर यांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आणि आदर्श लोकशाही व्यवस्था दिली.

या राज्यघटनेचं संरक्षण आणि लोकशाहीचं संवर्धन करण्याचं काम नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून होईल. त्याचं मनःपूर्वक अभिनंदन आणि यशस्वी करकिर्दीसाठी शुभूच्छा ! आशा प्रकारे अजित पवार यांनी द्रौपदी मुमूंना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी प्रतिभाताई पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.

हे सुध्दा वाचा:

CBSE बोर्डाने केला १० वीचा निकाल जाहीर

’या‘ कंपन्यांनी उचलले कामगार कपातीचे पाऊल

चक्क ‘वाघोबां’साठी वाहतूक थांबवली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी