30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उडाली झोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उडाली झोप

टीम लय भारी

मुंबईः एखादयाला जागे ठेवायचे असेल, तर स्वतः जागावे लागले. या न्यायाने देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्ष चांगली झोप घेतली नव्हती. आपल्या हातातून सत्ता गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जागता पहारा ठेवला होता. त्यामुळे त्यांना आज यश आले आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारला एक दिवस पण झोपू दयायचे नाही असा विडा उचलला होता. तो त्यांनी पुर्ण केल्याचे त्यांना मनस्वी समाधान प्राप्त झाले आहे. ते खरचं झोपले नव्हते. त्याच्या ध्यानी मनी केवळ महाविकास आघाडी सरकार दिसत होते. त्यामुळे ते मध्य रात्री देखील झोपेतून उठून, वेश बदलून एकनाथ शिंदेंना भेटायला गेले होते. त्यांनी आपला पण शब्दशः खरा करुन दाखवला. त्याची सुरस कथा त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील सांगितली. त्यामुळे ती संपूर्ण महाराष्ट्राला कळली.

आता इथून पुढे देवेंद्र फडणवीस झोपणार देखील नाहीत. कारण ते उपमुख्यमंत्री असले तरी मुख्यमंत्री पदाचे शरीराने नव्हे तर मनाने त्यांनाच काम करायचे आहे. त्यामुळे एकाच वेळी त्यांना दोन पदांचा गाडा हाकायचा आहे. शिवाय शत्रूच्या गोटातून आलेल्या माणसांवर कोणीही डोळेझाकून विश्वास ठेवत नाही. देवेंद्र फडणवीस हे समजण्या इतके सुज्ञ आहेत. शिवाय 40 जण शत्रूच्या गोटातून आले आहेत. त्यामुळे त्यांना आता पहिल्यापेक्षा डोळयात तेल घालून पहारा दयावा लागणार आहे. हे तितकेच सत्य आहे. दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे ही फडणवीसांची खासीयत आहे. त्यांच्या नसानसात राजकारण भिनले आहे. त्यामुळे असाध्य ते साध्य ते नक्की करु शकतात यात तिळ मात्र शंका नाही.

आज  नवी मुंबईत आयोजित भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे त्यांचे सहकारी यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, की हे सरकार यावे. ही तर श्रींची इच्छा होती. राज्यातील 12 कोटी जनतेची इच्छा होती. त्यांना परिवर्तन हवं होतं. ती इच्छा पूर्ण केली आहे. एक प्रकारे मोकळा श्वास आपण घेतो आहोत. गेली अडीच वर्ष संघर्षात गेली. राज्यात अडीच वर्ष अघोषित आणीबाणी होती. सरकार कोण चालवतंय, ते रामभरोसे होतं. ते पाहून वाटायचं की हे कसलं सरकार आहे. अशा भ्रष्ट सरकारला एक दिवस झोपू द्यायचं नाही असा पण केला. भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, त्यांनी या संघर्षात साथ दिली, असे फडणवीस म्हणाले.

हे सुध्दा वाचा:

काँग्रेस नेत्या अलका लांबाने केला स्मृती इराणींच्या मुलीवर आरोप

राजकारणाचे तीन तेरा, जनता देखती सिर्फ मेरा

‘भाजपला एकनाथ शिंदे नकोसे’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी