30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeएज्युकेशनEducation : व्हिजेटीआयचा अजब कारभार, कनिष्ठ शिक्षकाकडे दिले संचालकपद !

Education : व्हिजेटीआयचा अजब कारभार, कनिष्ठ शिक्षकाकडे दिले संचालकपद !

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिटयूट मुंबई संस्थेचे प्रभारी संचालक या पदावर प्राध्यपकांच्या सेवा ज्येष्ठतेच्या नियमानुसार नियुक्ती करण्याची मागणी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ईमेल द्वारे ॲङ अमोल मातेले यांनी केली आहे.

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिटयूट मुंबई संस्थेचे प्रभारी संचालक या पदावर प्राध्यपकांच्या सेवा ज्येष्ठतेच्या नियमानुसार नियुक्ती करण्याची मागणी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ईमेल द्वारे ॲङ अमोल मातेले यांनी केली आहे. या संस्थेचे पुर्णवेळ संचालक असलेले प्रा.धीरेन आर. पाटील यांचा कार्यकाळ 31 मे 2022 रोजी पुर्ण झाल्यानंतर शासनाचे नियम पायदळी तुडवून कोणतेही निर्देश नसतांना तसेच प्रचलित पद्धतीचा अवलंब न करता संचालक पदाचा कार्यभार मर्जीतील प्राध्यापक सुनील जी. भिरुड यांच्याकडे सुपूर्द केले. संस्थेच्या प्रभारी संचालक पदावर प्राध्यापकांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार  नियुक्ती करण्याची मागणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री अमोल मातेले यांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा

VIDEO : निर्जीव मूर्तीला सजीव करणारे ‘डोळे’

Mamata Banerjee : मला अटक करुन दाखवा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाजपला खुले आव्हान

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी केले पुन्हा एकदा सूचक वक्तव्य

सध्याचे प्रभारी संचालक व्ही.जे.टी.आय मुंबई संस्थेमध्ये कॅस अंतर्गत प्रोफेसर पदावर आहेत व सेवा ज्येष्टतेनुसार ते कनिष्ट पदावर असल्याचे ॲङ अमोल मातेले यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच संस्थेतील वर्कशॅप लॅबमधील काही शिक्षकेत्तर कर्मचारी हे प्रभारी संचालकाला विरोध करीत आहेत. त्यामुळे त्यांचा पदोन्नतीचा प्रस्ताव पाठवण्यात येत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आर्थ‍िक नुकसान होत आहे. या बाबत प्रचिलीत पद्धतीने वरिष्ठ प्राध्यापकास पदभार देण्यासाठी गांभीर्याने दखल घेण्याची विनंती ॲङ अमोल मातेले यांनी केली आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील कोणता निर्णय घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी