28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भशिवसेना - शिंदे गटात राडा

शिवसेना – शिंदे गटात राडा

आता एकीकडे शिवसेना (Shivsena) गटाचे कार्यकर्ते जिल्हा पेटवून देण्याची भाषा करू लागले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार थेट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फिरू देणार नाही, अशी भाषा वापरू लागल्याने येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

बुलडाणा येथील कृषी उत्पादन बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनेच्या (Shivsena) सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. आता एकीकडे शिवसेना गटाचे कार्यकर्ते जिल्हा पेटवून देण्याची भाषा करू लागले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार थेट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फिरू देणार नाही, अशी भाषा वापरू लागल्याने येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यामुळे बुलडाणा शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

शिवसेना - शिंदे गटात राडा

 

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : एकनाथ शिंदेंची चूक सुधारण्यासाठी शरद पवारांची उद्या बैठक !

Modi government : मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी शरद पवार, नितीश कुमार नवीन व्युहरचना आखणार

Cocaine : बापरे ! त्याने तब्बल 87 कोकेनच्या गोळया पोटात लपवल्या, कस्टमने घेतली झडती

कृषी उत्पादन बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनेच्या नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. कार्यक्रमात संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. यावेळी येथे पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.
याच वेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे पुत्र तसेच कार्यकर्ते या ठिकाणी आले. त्यांच्यामध्ये कुरबुर सुरू झाली.

त्या नंतर हे प्रकरण वाढत गेले आणिदोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने उभे राहिले. दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. ते एकमेकांसोबत भिडले. दोन्ही कडील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या देखील फेकल्या.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अधिक कुमक बोलावून घेतली. दोन्ही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. राज्यात गणेशोत्सव सुरू आहे आशा परिस्थ‍ितीमध्ये हे प्रकरण आणखी गंभीर होऊ नये यासाठी पोलिसांनी शांतता राखण्याचे नागरिकांना आव्हान केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी