29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमंत्रालयMantralay News : हेमराज बागुल यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदी...

Mantralay News : हेमराज बागुल यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदी नियुक्ती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदी हेमराज बागुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी गुरुवारी (ता. 17 नोव्हेंबर) मंत्रालयात स्वीकारला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदी हेमराज बागुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी गुरुवारी (ता. 17 नोव्हेंबर) मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्या हस्ते हेमराज बागुल यांनी त्यांच्या नव्या पदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांनी बागुल यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

तसेच महासंचालनालयाचे असलेले नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही हेमराज बागुल यांच्याकडे देण्यात आला आहे. बागुल यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयात प्रकाशने, महान्यूज, वृत्त आदी शाखांमध्ये उत्तम जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी हेमराज बागुल यांनी पत्रकारिता क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध पुरस्कारांनी हेमराज बागुल यांना याआधी सन्मानित करण्यात आले आहे.

16 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता’ दिवस म्हणून साजरा करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या हेमराज बागुल यांनी या विशेष दिनानिमित्त नागपूर येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर प्रेस क्लब आणि श्रमिक पत्रकार संघ यांनी नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी ‘राष्ट्राच्या उभारणीत माध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर हेमराज बागुल यांनी आपले मत मांडले.

हे सुद्धा वाचा

Recruitment : नोकरभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Narayan Rane : अखेर राणेंनी स्वत:च ‘अधीश’ बंगल्यावर चालवला हातोडा

Eknath Shinde Prakash Ambedkar Meeting:एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या घरी; काय झाली चर्चा?

‘माध्यमांचा विकास हा कालानुरूप होत आहे. माध्यमांनी काळानुरूप आपली भूमिका बदलली आहे. छापखान्याचा शोध हा गेल्या काही काळातील सर्वात मोठा शोध आहे. छापखान्याच्या शोधानंतर धर्मग्रंथाची छपाई सुरु झाली. यातून वैचारिक मंथन होण्यास सुरुवात झाली. प्रारंभी सामाजिक परिवर्तनाला माध्यमांनी प्राधान्य दिले. माध्यमांनी केवळ प्रबोधनात्मक भूमिकेवर कायम न राहता सिंहावलोकन करीत केंद्रबिंदू ठेवायला हवा,’ असे मत हेमराज बागुल यांनी व्यक्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी