31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयआम्हीही मातोश्रीवर खोकेच पोहोचवले आहेत..!

आम्हीही मातोश्रीवर खोकेच पोहोचवले आहेत..!

पन्नास खोके, पन्नास खोके... खाऊन खाऊन माजलेत बोके... अशी शिंदे गटातील आमदारांची हेटाळणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर भाजपचे नेते, केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जळजळीत शब्दांत प्रहार केला आहे. तुम्ही खोके नाही घेतले का? आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जात होतो का? असे खोचक सवाल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले आहेत. मातोश्रीच्या माळ्यावर आम्ही काय काय पोहोचवले ते उद्धव ठाकरे सांगतील त्या दिवशी मी जाहीरपणे सांगेन, असे आव्हान राणे यांनी ठाकरे यांना दिले आहे. नारायण राणेंच्या या स्पष्टवक्तेपणामुळे "मातोश्री" वरील अर्थपूर्ण राजकारण जनतेसमोर येत आहे.

नारायण राणे (Naryan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा निशाणा साधला असून शिंदे-फडणवीस सरकारला ‘खोके सरकार’ म्हणून हिणवणाऱ्या ठाकरे गटाला तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले,” तुम्ही दुसऱ्यांवर खोके घेतले म्हणून टीका करता तुम्ही खोके नाही घेतले का? आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? मातोश्रीच्या (Matoshri) माळ्यावर काय काय पोहोचवलं ते उद्धव ठाकरे सांगतील त्या दिवशी मी जाहीर करेन”. भांडूप येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या कोकण महोत्सवात नारायण राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. (Naryan Rane criticizes Uddhav Thackeray we have also delivered “khoka” to Matoshree..!)

तुम्ही दुसऱ्यांवर खोके घेतले म्हणून टीका करता तुम्ही खोके नाही घेतले का? आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का?

                                                       – नारायण राणे, केंद्रीय मंत्री

हे सुद्धा वाचा

जा आणि आधी भारतीय संस्कृती शिका!

112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा तातडीची मदत!

युवा पिढीला नशेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्जविरोधी रणनिती : देवेंद्र फडणवीस

 

हे तर माझंच पाप…
शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात मागील काही दिवस विस्तव जात नाही. संजय राऊत हे खासदार कोणामुळे झाले याबाबतचा किस्सा सांगताना हे तर माझेच पाप होते, अशी कबुली राणेंनी यावेळी दिली. “संजय राऊत हे संपादक आहेत, खासदार आहेत. पण ते तर माझंच पाप आहे. एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावले होते. त्यावेळी संजय राऊत बाळासाहेबांपाशी बसलेले होते. त्यावेळी मी विधीमंडळात विरोधी पक्षनेता होतो. मी बाळासाहेबांना विचारले मला कशासाठी बोलावले आहे? तेव्हा त्यांनी मला सांगितले की, आपल्याला संजय राऊतला खासदार बनवायचे आहे. त्याला घेऊन जा… खासदार कर… तेव्हा मी हो म्हणालो होतो.” संजय राऊत हे माझ्यामुळेच खासदार झाल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी